३५व्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई शहर
संघ जाहीर!
गार्गी खोपकर पूर्व तर सानिका शिगवण पश्र्चिम संघाची
कर्णधार
मुंबई : मनमाड, नाशिक येथे होणाऱ्या ३५व्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी
स्पर्धेसाठी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आपले पूर्व आणि पश्र्चिम असे दोन्ही संघ जाहीर
केले आहेत. गार्गी खोपकर हिच्याकडे पूर्व संघाचे नेतृत्व,
तर सानिका शिगवण
हिच्याकडे पश्र्चिम संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून सकाळी ८:३० वाजता
मनमाड येथील गुरू गोविंदसिंह गुरुकुल समोरील हॅलीपॅड मैदानावर
सुरू होणार आहे. मुंबई संघ आज (२२ फेब्रुवारी) स्पर्धेसाठी रवाना
झाला आहे.
मुंबई शहर पूर्व विभाग संघ :
गार्गी खोपकर (कर्णधार), दिया घाडगे,
समीक्षा सांडव, साजिरी साळुंके, रुपाली साव, सिद्धी ढोके, मानसी सिंग, राजनंदिनी पटवा, स्वामिनी साळुंखे, श्रेया पवार, सिद्धी बुगडे, वेदिका सावंत, प्रशिक्षक : दिनेश पाटील, व्यवस्थापिका : सौ. माधुरी वरळीकर,
मुंबई शहर पश्र्चिम विभाग संघ :
सानिका शिगवण (कर्णधार), श्रुती शिंदे,
सई भुवड, फलक अन्सारी, गायत्री गुप्ता, मानसी रेडेकर, साईक्षा पेडणेकर, काव्या गुरव, पूजा खोत, आर्या पाटील, श्रावणी पवार, जान्हवी पोतदार, प्रशिक्षक
: संदीप काळगांकर, व्यवस्थापिका
: सौ. भाग्यश्री भुरके,
या स्पर्धेत राज्यभरातून नामांकित संघ सहभागी होणार असून,
मुंबई संघाकडून दमदार कामगिरीची
अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही संघ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाले असून,
खेळाडू सर्वोत्तम खेळाची चुणूक दाखवतील,
असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments