जामनेरमध्ये कुस्तीचा महाकुंभ !
अमृता पुजारी व विजय चौधरी यांचे वर्चस्व !!
जळगाव, १७ (क्रीडा प्रतिनिधी) : लाल मातीत घमासान सुरू असलेल्या देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये भारतीय
पैलवानांनी आपले वर्चस्व गाजवत परदेशी प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले.
महाराष्ट्राच्या महिला केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी
यांनी दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद
सिद्ध केली.
महिला कुस्तीला ऐतिहासिक मान!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर प्रथमच
महिला कुस्तीला विशेष सन्मान मिळाला. या दंगलीतील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची होती, यामुळे महिला कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे
वातावरण पाहायला मिळाले.
अमृता पुजारीची दमदार खेळी!
महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्टने
हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. तिच्या अचूक डावपेचांनी विरोधकाला संधीही दिली नाही.
विजय चौधरीचे वर्चस्व, दोन मिनिटांत विजय!
आशियाई विजेत्या उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला अवघ्या
दोन मिनिटांत चितपट करत विजय
चौधरीने प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटील, शिवराज राक्षे यांनीही दमदार विजय मिळवत भारतीय कुस्तीला नवा आयाम दिला.
भारताचा दबदबा, ९ देशांतील पैलवानांना धूळ चारली!
मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील, जॉर्जिया, फ्रान्स आणि भारत या ९ देशांच्या पैलवानांनी यात भाग घेतला.
मात्र, मैदानावर भारतीय खेळाडूंनी आघाडी घेत परदेशी
प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक!
"भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण
केली आहे,
ही अभिमानास्पद बाब आहे," असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच, "लाल मातीतील कुस्ती परत जोमात येत आहे,
हा महाराष्ट्रासाठी
आनंदाचा क्षण आहे," असे त्यांनी सांगितले.
५० हजार कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जामनेरमध्ये झालेल्या या भव्य दंगलीला ५०,००० हून अधिक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,
मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी मैदान गाजवले!
"महाराष्ट्र कुस्तीचा गड आहे,
आणि याच गडावरून
जागतिक विजेते निर्माण होतील," असा विश्वास व्यक्त करत कुस्तीप्रेमींनी महाराष्ट्राच्या
पैलवानांचे कौतुक केले!
.jpeg)
Post a Comment
0 Comments