Type Here to Get Search Results !

मुंबईत ५८वी सब-ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – ९ मार्चपासून


 

मुंबईत ५८वी सब-ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – ९ मार्चपासून

मुंबई : महाराष्ट्रातील युवा कॅरमपटूंना चमकदार खेळ सादर करण्याची संधी मिळणार आहे! महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, दादर यांच्या सहकार्याने ५८व्या सब-ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा ९ मार्च २०२५ रोजी एम.सी.ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.

 

स्पर्धेचे स्वरूप आणि गटवाटप :

ही स्पर्धा चार वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडेल :

१२ वर्षाखालील मुले (कॅडेट गट - एकेरी), १२ वर्षाखालील मुली (कॅडेट गट - एकेरी), १४ वर्षाखालील मुले (सब-ज्युनियर गट - एकेरी), १४ वर्षाखालील मुली (सब-ज्युनियर गट - एकेरी)

 

प्रवेश आणि नोंदणी प्रक्रिया :

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्यांतून १२ वर्षाखालील गटात प्रत्येकी २ खेळाडू आणि १४ वर्षाखालील गटात प्रत्येकी ६ खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashracarromassociation.com) उपलब्ध आहेत.

 

प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत : १ मार्च २०२५

या स्पर्धेमधून महाराष्ट्राच्या उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील युवा कॅरमपटूंसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चुकार खेळाडूंना यंदाच्या स्पर्धेसाठी पात्र होता येणार नाही, त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी वेळेत अर्ज करावेत.


Post a Comment

0 Comments