Type Here to Get Search Results !

वस्ताद वसंतराव पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित!

 


वस्ताद वसंतराव पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित!

 

मुंबई: भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांना कुस्ती क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी २०२५ चा राज्यस्तरीय प्रतिष्ठा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सांगलीतील प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

पुरस्कार प्रदान समारंभ:

हा सोहळा समृद्धी मल्टीपर्पज हॉल, जुना येळावी रस्ता, तासगाव, जिल्हा-सांगली येथे संपन्न झाला. यावेळी प्रा. डॉ. माणिकराव साळुंखेनामवंत शिक्षणतज्ज्ञ, प्रा. डॉ. रणधीर शिंदे ज्येष्ठ समीक्षक, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, प्रा. डॉ. बाबुराव गुरवज्येष्ठ साहित्यिक, नाजरुद्दिन नायकवडीशिवछत्रपती पुरस्कार विजेते, नामवंत पैलवान उपस्थित होते.

 

वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे योगदान:

मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यात वस्ताद वसंतराव पाटील यांनी तीन दशकांहून अधिक काळ युवा कुस्तीपटू घडवण्याचे मोठे कार्य केले आहे.

 

वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक कुस्तीपटू:

शालेय, विद्यापीठ, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत. तसेच भाईंदर शहरात कुस्ती प्रशिक्षणासाठी भव्य श्री गणेश आखाड्याच्या उभारणीत पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

 

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गणेश आखाड्याच्या वतीने तसेच संपूर्ण भाईंदरवासियांच्या वतीने वस्ताद वसंतराव पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केल जात आहे.


Post a Comment

0 Comments