प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेत फोर्ट
यंगस्टर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय!
मुंबई: माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क
जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत
फोर्ट यंगस्टर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबचा
पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
जान्हवी काटे व मानसी पाटीलचा अष्टपैलू खेळ
फोर्ट यंगस्टर्ससाठी सलामीवीर जान्हवी काटे (५६ चेंडूत ८६ धावा) व मानसी पाटील (३१ चेंडूत
३४ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत संघाला २० षटकांत
४ बाद १६३ धावा
या भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
🔹 राजावाडी क्लबचा प्रत्युत्तरातील संघर्ष:
विजयासाठी १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना
अचल वळंजू (३३ चेंडूत ४१ धावा)
चांगल्या लयीत होती. मात्र, मानसी पाटील (२९ धावांत ३ बळी) व हिमजा पाटील (२१ धावांत २
बळी) यांच्या फिरकीच्या जाळ्यात राजावाडी संघ अडकला आणि १२ व्या षटकात
७८ धावांत निम्मा संघ तंबूत परतला.
🔹 क्षमा पाटेकर व निविया आंब्रेचा झुंजार खेळ:
संकटात सापडलेल्या राजावाडी क्लबसाठी क्षमा पाटेकर (३१ चेंडूत नाबाद ६० धावा) व निविया आंब्रे
(२७ चेंडूत नाबाद ३३ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ४८ चेंडूत ८५ धावांची अभेद्य भागीदारी
करत सामना रोमहर्षक स्थितीत आणला. अखेर
राजावाडी क्लबने देखील १६३ धावा
काढत सामना बरोबरीत नेला आणि निकालासाठी सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
🔥 सुपर ओव्हरचा थरार:
राजावाडी क्लबचा डाव: मानसी पाटीलच्या ऑफ ब्रेक गोलंदाजीसमोर राजावाडी संघ
६ चेंडूत केवळ ८ धावा
करू शकला.
फोर्ट यंगस्टर्सचा विजय: जान्हवी काटेने (३ चेंडूत नाबाद ९ धावा)
दोन चौकार मारत ४ चेंडूत बिनबाद १० धावा करत फोर्ट यंगस्टर्सला रोमांचक विजय मिळवून दिला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनचा सहज
विजय
दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ७ विकेट्सने पराभूत
करत उपांत्य फेरी गाठली.
साईनाथ क्लबची खराब सुरुवात: जाई गवाणकर (४-०-२६-४) व सिध्दी पवार (४-१-५-२)
यांच्या अचूक माऱ्यामुळे साईनाथ क्लबचा डाव डळमळीत झाला. किंजल
कुमारीने ४२ चेंडूत ४३ धावा करत संघाचा डाव सावरला, मात्र २० षटकांत संघ ८ बाद ११४ धावा करू शकला.
वेंगसरकर फाउंडेशनचा सहज विजय: पूनम राऊत व जाई गवाणकरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे
१४व्या षटकात ३ बाद ११७ धावा करत
विजय साकारला.
सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू:
जान्हवी काटे (फोर्ट यंगस्टर्स), जाई गवाणकर (वेंगसरकर फाउंडेशन)

Post a Comment
0 Comments