३५वी किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी
स्पर्धा मनमाड, नाशिकला होणार
महाराष्ट्राचा राष्ट्रीय कबड्डी संघ निवडला जाणार!
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक
जिल्हा कबड्डी असो. च्या विद्यमाने दिनांक २३ ते २७ फेब्रु. २०२५ या कालावधीत
"३५व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. मनमाड, नाशिक येथील श्री. गुरू गोविंद सिंह हायस्कूल शेजारील हॅलीपॅड मैदानावर
मॅटच्या ४ क्रीडांगणावर हे सामने खेळविले जातील. सामने सकाळ व सायंकाळ या दोन्ही
सत्रात खेळविले जातील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा किशोर व किशोरी गटाचा संघ
निवडण्यात येईल. हा निवडण्यात आलेला संघ काश्मीर येथे होणाऱ्या किशोर/किशोरी गट
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.
स्पर्धेचे वेळापत्रक:
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जिल्हा संघाना सूचित करण्यात
येते की त्यांनी आपले किशोरी(मुली) गटाचे संघ दिनांक २२फेब्रु. रोजी दुपारी ०३-००
वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होतील याची दक्षता घ्यावी. त्याच दिवशी सर्व
संघांची छाननी केली जाईल. दिनांक २३ व २४ या दोन दिवसात साखळीती व उप उपांत्यपूर्व
आणि उपांत्यपूर्व सामने खेळविले जातील. तसेच किशोर(मुले) गट संघानी दिनांक
२४फेब्रु. रोजी दुपारी ०३-०० वाजेपर्यंत आपली उपस्थिती राखावी. त्यांची छाननी
त्याच दिवशी करण्यात येईल. मुलांचे सामने दिनांक २५ व २६ या दोन दिवसात खेळविण्यात
येतील. दोन्ही गटाचे उपांत्य व अंतिम सामने दिनांक २७ फेब्रु. रोजी सायंकाळच्या
सत्रात खेळविण्यात येतील.
मनमाडला ३० वर्षांनी संधी!
तीस वर्षांनंतर मनमाडला हे सामने पुन्हा होत आहेत. जय भवानी
मंडळाच्या सहकार्याने १९९५ साली मनमाड येथे किशोर गटाचे सामने झाले होते. त्यानंतर
मनमाडकरांना हा मान मिळाला आहे. सर्व खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था
गुरुद्वारामार्फत करण्यात आली आहे. या स्पर्धेला आमदार सुहास कांदे,
आम. मुक्ती मोहम्मद इस्माईल, आम. किशोर दराडे, आम. सत्याजित तांबे आदीचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment
0 Comments