Type Here to Get Search Results !

श्रीवल्ली भामीदिप्ती, रिया भाटिया जोडीचा एल अॅण्ड टी मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

 



श्रीवल्ली भामीदिप्ती, रिया भाटिया जोडीचा एल अॅण्ड टी मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

 

मुंबई ५ फेब्रुवारी - भारताच्या श्रीवल्ली बामीदिप्ती-रिया भाटिया, प्रार्थना ठोंबऱे आणि ऋतुजा भोसले यांनी एल अॅण्ड टी मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. श्रीवल्ली-रिया जोडीने जपानच्या माई होन्टामा-क्योका ओकामुरा जोडीला पराभूत केले, तर प्रार्थनाने नेदरलँडच्या एरियन हार्टोनासह खेळताना विजय मिळवला.

 

एकेरीत थायलंडच्या लुक्सिका तारारुडीने स्लोवाकियाच्या अॅना कॅरोलिनाला ७-६, ६-४ असे पराभूत करत शानदार खेळ दाखवला. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला, पण लुक्सिकाने निर्णायक क्षणी प्रभावी खेळ करत विजय मिळवला. तिच्या ताकदीच्या शॉट्स आणि नेटवरील खेळाने विजय सुकर केला.

 


जपानच्या माई होन्टामाने फिलिपिन्सच्या अॅलेक्झांड्रा इलाला ७-६, ६-२ असे सहज हरवले. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये होन्टामाने वर्चस्व राखले.


दुहेरीत प्रार्थना ठोंबऱे-एरियन हार्टोनो जोडीने थायलंडच्या पेंगटार्न प्लिपुएच-जपानच्या नाहा सातो जोडीवर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला. श्रीवल्ली-रिया जोडीने सुपर टायब्रेकरमध्ये जपानच्या माई होन्टामा-क्योका ओकामुरा जोडीला ५-७, ६-२, १०-७ असे नमवले. पहिला सेट गमावल्यावरही भारतीय जोडीने लवचिकता आणि संयम राखत विजय संपादन केला.

 

ग्रेट ब्रिटनच्या एडन सिल्वा-रशियाच्या अॅनास्तासिया तिखोनोव्हा, तसेच जपानच्या नाओ हिबिनो-जॉर्जियाच्या ओक्साना कलाश्निकोवा जोडीने पुढील फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या मानांकित रशियन अॅनास्तासिया अंश्बा-एकटेरिना प्रिडांकिना जोडीने फिलिपिन्सच्या अॅलेक्स इला-चिया यी त्साओ जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. भारताची ऋतुजा भोसले-ग्रेट ब्रिटनची अॅलिसिया बार्नेट जोडी न खेळताच पुढे गेली, कारण त्यांची प्रतिस्पर्धी जोडी स्पर्धेतून माघार घेतली.

 


Post a Comment

0 Comments