Type Here to Get Search Results !

जामनेरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! ९ देशांचे नामवंत मल्ल रविवारी भिडणार पन्नास हजारांहून अधिक कुस्तीप्रेमींचा उत्साहशीर सहभाग २०० हून अधिक कुस्त्या – जागतिक दर्जाच्या मल्लांचा थरार विजेत्यांना ‘देवाभाऊ केसरी’ किताब आणि चांदीची गदा

 


जामनेरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! ९ देशांचे नामवंत मल्ल रविवारी भिडणार

 

पन्नास हजारांहून अधिक कुस्तीप्रेमींचा उत्साहशीर सहभाग

२०० हून अधिक कुस्त्या – जागतिक दर्जाच्या मल्लांचा थरार

विजेत्यांना ‘देवाभाऊ केसरी’ किताब आणि चांदीची गदा

 

जळगाव: रविवारी, १६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये कुस्तीचा महामेळा रंगणार असून, तब्बल ९ देशांतील नामवंत मल्ल आणि भारतातील ४०० हून अधिक पैलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत. पन्नास हजारांहून अधिक कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत हा थरारक कुस्ती महाकुंभ पार पडणार आहे. नमो कुस्ती महाकुंभानिमित्त ‘देवाभाऊ केसरी’ स्पर्धा होत असून, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि आशियाई पदकविजेता जलाल म्हजोयूब यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ऐतिहासिक आयोजन – ९ देशांचे मल्ल कुस्तीच्या आखाड्यात!

भारतीय कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच ९ वेगवेगळ्या देशांचे कुस्तीपटू एकाच मंचावर भारतीय मल्लांविरुद्ध झुंजणार आहेत. भारतासह फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया येथील ऑलिंपियन, जागतिक विजेते आणि राष्ट्रीय विजेत्यांचा सहभाग असणार आहे.

प्रमुख कुस्ती लढती:

पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब (आशियाई पदकविजेता - इराण)


विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशियन विजेता - उझबेकिस्तान)


शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन - ब्राझील)


सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै. जस्सा (शेर ए पंजाब)


भूपिंदर सिंह (भारत केसरी - पंजाब) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता - हरियाणा)


ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी वि. एस्टोनियाची युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूला

 

महिलांच्या कुस्तीला ऐतिहासिक सन्मान

पहिल्यांदाच या स्पर्धेत महिला कुस्तीपटूंना विशेष मान मिळणार असून तब्बल ५० महिला कुस्त्या रंगणार आहेत. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप महिला कुस्तीने होणार, यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये मोठा आनंद आहे.

 

विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

विजेत्यांना देवाभाऊ केसरी’ किताब, चांदीची तीन किलो वजनाची गदा आणि मानाचा पट्टा प्रदान केला जाणार आहे. तसेच, पराभूत खेळाडूंनाही रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

 

गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन

कुस्ती क्षेत्रात जळगावच्या जामनेरने ऐतिहासिक आयोजनाच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने ही दंगल भव्य प्रमाणावर साकार होत आहे. जागतिक दर्जाच्या या कुस्ती महाकुंभाचा थरार कुस्तीप्रेमींना विसरणार नाही, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments