शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत प्रणय,
कमलेश,
सिद्धेश दुसऱ्या फेरीत
मुंबई: १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला
उत्साहात सुरुवात झाली असून, पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत मुंबई उपनगरच्या प्रणय जाधव,
मुंबईच्या कमलेश राठोड
आणि पालघरच्या प्रताप सावंतने दमदार विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप
यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा,
मानद सचिव अरुण केदार,
उपाध्यक्ष यतिन ठाकूर,
मंजूर अहमद खान,
प्रदीप भाटकर,
खजिनदार अजित सावंत,
सहसचिव केतन चिखले,
योगेश फणसळकर
तसेच जिमखान्याचे ट्रस्टी प्रकाश नायक,
वाईस चेअरमन विश्वास
नेरुरकर, कार्ड
विभाग सचिव अजय पाटणकर, खजिनदार सी. ए. विलास सोमण,
सहसचिव सुनील
रामचंद्रन, इनडोअर सचिव सनिल समेळ व कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर
आदी मान्यवर उपस्थित होते. महिला एकेरी गटाचे सामने
उद्या दुपारी खेळविले जाणार
आहेत.
पुरुष एकेरी - पहिल्या फेरीचे निकाल:
प्रणय जाधव (मुंबई उपनगर) वि. निमिष कराळकर (मुंबई)
– १२-२०,
२५-३,
२५-०
अतुल अभ्यंकर (ठाणे) वि. अमीन सय्यद (पालघर)
– २०-१९,
२५-११
रोहित मिरजकर (पुणे) वि. नितीन शिरसाठ (रायगड)
– २५-७,
२५-०
वैभव कोरगावकर (ठाणे) वि. विद्याधर पाटसकर (मुंबई)
– २५-५,
२५-२
संतोष पालवणकर (पालघर) वि. स्वप्नील मांगलेकर (रायगड)
– २५-४,
२३-११
प्रताप सावंत (पालघर) वि. रोहित बालिद (पुणे)
– १५-१७,
२४-१६,
१७-१०
सिद्धेश भोईर (मुंबई उपनगर) वि. अभय मयेकर (मुंबई)
– १९-२४,
१७-१३,
२२-१९
सय्यद मोहसीन (जळगाव) वि. गोविंद चुरी (मुंबई उपनगर)
– २१-१६,
२५-१४
नीलांश चिपळूणकर (मुंबई) वि. महेश कुपेरकर (मुंबई)
– २०-६,
२५-०
कमलेश राठोड (मुंबई) वि. मनोज सप्रे (रत्नागिरी)
– ८-२४,
२४-७,
२४-८
सोबत: शिवाजी पार्क जिमखाना स्पर्धेच्या उद्घाटनाचा फोटो.

Post a Comment
0 Comments