उमेश गुप्ताने पटकावला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात
पुणे, दि. ८ (क्री.प्र.) -
'मूर्ती छोटी,
पण कीर्ती महान' या म्हणीचा प्रत्यय देत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने 'महाराष्ट्र श्री' स्पर्धेत गतविजेता हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा यांच्यावर
विजय मिळवत प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र श्री' किताब पटकावला. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या उमेशने
यंदा आपले अपयश धुऊन काढत सर्वोच्च सन्मान मिळवला. महिलांच्या गटातही मुंबई
उपनगरच्या रेखा शिंदेने आपले वर्चस्व कायम राखत 'मिस महाराष्ट्र'चा किताब पटकावला.
थेऊरमध्ये पीळदार स्पर्धा
श्री चिंतामणी मंदिर, थेऊर येथे आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत
महाराष्ट्रभरातील १६० पुरुष शरीरसौष्ठवपटू, ५५ फिजीक स्पोर्ट्स स्पर्धक आणि १२ महिलांनी आपली कसरत
दाखवत मंच गाजवला. 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'साठी रंगलेल्या अंतिम फेरीत नऊही गटविजेते समोरासमोर आले.
सर्वांचे लक्ष गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा यांच्याकडे लागले असताना,
उमेश गुप्ताने आपल्या उत्तम व्यायामशैली,
आखीवरेखीव स्नायू आणि पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर निर्णायक
विजय मिळवला.
मुंबई उपनगरचे वर्चस्व
मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत
सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यांनी एकूण २४८ गुण मिळवत पुण्याला (१७३
गुण) मागे टाकले. तसेच, पुरुष फिजीक स्पोर्ट्समध्ये पुण्याच्या नरेंद्र व्हाळेकर आणि शुभम पवार यांनी
अनुक्रमे १७० सेमी आणि १७० सेमीवरील गटात अव्वल स्थान मिळवले.
विजेत्यांचा गौरव आणि मोठा बक्षीसवर्षाव
स्पर्धेच्या विजेत्यांना तब्बल १० लाख रुपयांचे रोख बक्षीस
देण्यात आले. या भव्य सोहळ्याला आयोजक नवनाथ काकडे, आमदार राहुल कूल, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, आयबीबीएफ व एबीबीएफचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे,
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस अजय खानविलकर,
खजिनदार सुनील शेगडे, राजेश सावंत, राजेंद्र सातपूरकर, नरेंद्र कदम, विशाल परब यांची उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र श्री २०२५ स्पर्धेचा निकाल:
५५ किलो वजनी गट: १.हनुमान भगत (रायगड), २. जुगल शिवले (रायगड),
३.राजेश तारवे (मुंबई),
४.सोमनाथ पाल (पुणे),
५.अक्षय गव्हाणे (मुंबई उपनगर), ६. निलेश गजमल (पुणे)
६० किलो : १. संदीप सावळे (मुंबई उपनगर), २. बाळू काटे (पुणे), ३. सुयश सावंत (मुंबई उपनगर), ४. गणेश पाटील
(रायगड). ५.दुर्गेश मेहेर (पश्चिम ठाणे), ६. अजित गोंडफाळे
(पुणे).
६५ किलो: १.उदेश ठाकूर (रायगड), २. सचिन सावंत ( पुणे), ३.नदीम शेख ( मुंबई), ४.नरेंद्र व्हाळेकर (पुणे),
५.निलेश धोंडे (पुणे),६.कोईरंबा (पश्चिम ठाणे)
७० किलो:
१.उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), २. संकेत भरम (मुंबई उपनगर), ३. प्रशांत
कोराळे (पुणे), ४. दीपक राऊळ (रायगड), ५.विशाल
धावडे (मुंबई उपनगर), ६.शिवांग वगळ (नाशिक).
७५ किलो: १.गणेश उपाध्याय (मुंबई उपनगर),
२.भगवान बोराडे (मुंबई उपनगर), ३.
उदय देवरे (रायगड), ४.आकाश गडमल (पुणे), ५. विश्वम्भर राऊळ (मंबई उपनगर), ६. अकबर कुरेशी
(सोलापूर).
८० किलो: १.कमलेश अच्चारा (पुणे), २.
संजय प्रजापती (मुंबई उपनगर), ३.आमेर पठाण (छ. संभाजीनगर), ४. महेंद्र
पाचपुते (पिंपरी चिंचवड), ५. मयूर शिंदे (नाशिक), ६.अमोल जाधव (मुंबई उपनगर),
८५ किलो: १.प्रभाकर पाटील (रायगड), २.अक्षय शिंदे (पुणे ),३. फिरोज शेख (पुणे), ४.संदेश सावंत (सिंधुदुर्ग),
५.प्रणव खातू (मुंबई उपनगर), ६.उदय ननावरे
(पुणे).
९० किलो: १.सोहम चाकणकर(पुणे), २.अभिषेक लोंढे (मुंबई उपनगर ), ३.सुखमीत सिंग (रायगड), ४. उबेद पटेल - (मुंबई ),
५.प्रणव सुदेवार (पुणे) , ६.अरुण नेवरेकर
(मुंबई).
९० किलो वरील: १.हरमित सिंग (मुंबई उपनगर), २.निलेश रेमजे (मुंबई उपनगर), ३.प्रवीण खोब्रागडे (पुणे), ४.नितीन दोडके (छ.
संभाजीनगर) ५.अभिषेक गायकवाड (रायगड)
मिस
महाराष्ट्र-महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे (मुंबई उपनगर),
२.किमया बेर्डे (मुंबई),
३.ममता वेझरकर (मुंबई उपनगर).
मेन्स फिजिक (१७० सेमी) : १. नरेंद्र व्हाळेकर (पुणे), २.अनिकेत पाटील (रायगड)३. सचिन बोईनवाद
(पश्चिम ठाणे), ४.जी.
शंकर शंभूका (पुणे), ५.अक्षय दांडेकर (कोल्हापूर)६. साहिल
सावंत (कोल्हापूर).
मेन्स फिजिक (१७० सेमीवरील): १.शुभम पवार (पुणे), २.स्वागत पाटील (रायगड), ३.रत्नेश सिंग
(पालघर),
४.आकाश दंडमल (पुणे), ५) निलेश गुरव (मुंबई), ६.रोहन गोगावले (नाशिक)
किताब विजेता: उमेश गुप्ता (मुंबई उपनगर)
उपविजेता: कमलेश अच्चरा (पुणे)
प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू:उद्देश ठाकूर (रायगड)
उत्कृष्ट पोजर: हरमित सिंग (मुंबई उपनगर)
सांघिक विजेतेपद: मुंबई उपनगर ( २४८ गुण )
उपसांघिक विजेतेपद: पुणे (१७३)


.jpeg)
Post a Comment
0 Comments