Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर!


महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर!

 

मुंबई, मुंबई विद्यापीठाने आपल्या दमदार कामगिरीने २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवावर विजयी मोहोर उमटवली आहे. ४३० गुणांची भक्कम कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई विद्यापीठाने पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुण मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे या प्रतिष्ठित क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

मुंबई विद्यापीठाच्या संघांचा दणदणीत विजय!

या महोत्सवात मुंबई विद्यापीठाने विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट प्रदर्शन करताना नेत्रदीपक यश संपादन केले.

प्रथम क्रमांक: खोखो (मुली), टेबल टेनिस (मुली), बॅडमिंटन (मुले), कबड्डी (मुली), बुद्धिबळ (मुले).


द्वितीय क्रमांक: कबड्डी (मुले), बुद्धिबळ (मुली), बास्केटबॉल (मुले), ॲथलेटिक्स (मुली), ॲथलेटिक्स (मुले).


तृतीय क्रमांक: व्हॉलीबॉल (मुली), बास्केटबॉल (मुली), खोखो (मुले).

या

सोबतच मुंबई विद्यापीठाने एकूण ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई करत राज्यभरातील विद्यापीठांमध्ये आपली आघाडी स्पष्ट केली.

 

कुलगुरूंचे कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

विद्यापीठाच्या खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, तसेच क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, मार्गदर्शक आणि संघ व्यवस्थापकांच्या अथक प्रयत्नांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

 

कला, क्रीडा आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल!

मुंबई विद्यापीठाने सांस्कृतिक युवा महोत्सव आणि आविष्कार संशोधन महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावत आधीच आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता क्रीडा महोत्सवाच्या विजेतेपदासह मुंबई विद्यापीठ कला, क्रीडा आणि संशोधनाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये राज्यात अव्वल स्थानी पोहोचले आहे.

 


Post a Comment

0 Comments