इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा
ओरिएंटल इन्शुरन्सचा दमदार विजय,
एचपीसीएलवर 6
विकेट्सने मात
मुंबई: इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत ओरिएंटल इन्शुरन्स संघाने
उत्कृष्ट कामगिरी करत एचपीसीएलवर 6 विकेट्सने विजय मिळवला.
एचपीसीएलने प्रथम फलंदाजी करताना 20
षटकांत 7
बाद 169
धावांचे आव्हान उभे
केले. सलामीवीर इंद्रजीत शिंदे (50) आणि राजसिंग देशमुख (50) यांनी अर्धशतके ठोकत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. नमन
झंवर (26)
आणि अनिकेत सिंग (25) यांनीही उपयुक्त योगदान दिले.
ओरिएंटल इन्शुरन्सकडून भूषण संघवी (4/25) आणि मीत पटेल (2/28) यांनी अचूक गोलंदाजी करत एचपीसीएलच्या धावसंख्येला मर्यादा
घातली.
संघवी-घोसाळकर जोडीचा विजयात मोठा वाटा
170
धावांचा पाठलाग करताना
ओरिएंटल इन्शुरन्स संघाची सुरुवात संमिश्र राहिली. अमन वर्मा (24) आणि वंश देवेंद्र (24) यांनी धडाकेबाज सुरुवात केली, मात्र झटपट दोन विकेट्स गेल्याने संघावर दबाव आला.
यानंतर, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील अथर्व घोसाळकर (नाबाद 45)
आणि भूषण संघवी (नाबाद
56)
यांनी जबरदस्त फलंदाजी
करताना 122 धावांची
अभेद्य भागीदारी रचली आणि संघाचा विजय सुकर केला.
ओरिएंटल इन्शुरन्सने हे लक्ष्य 17.4
षटकांत 4
विकेट्स गमावत पार
केले आणि शानदार विजयाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक:
एचपीसीएल सीसी - 20 षटकांत 7 बाद 169, (इंद्रजीत शिंदे 50, राजसिंग देशमुख 50, नमन झंवर 26, अनिकेत
सिंग 25;
भूषण संघवी 4/25, मीत पटेल 2/28)
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सीसी -
17.4 षटकांत 4
बाद 173, (भूषण संघवी 56*, अथर्व घोसाळकर 45*, अमन वर्मा 24; आशीष मिश्रा 2/36)
निकाल: ओरिएंटल इन्शुरन्सने 6 विकेट्स राखून विजय मिळवला.

Post a Comment
0 Comments