Type Here to Get Search Results !

सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा 2025 सीसीआयच्या नीता संघवींची विजयी सलामी


 

सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा 2025

सीसीआयच्या नीता संघवींची विजयी सलामी

 

मुंबई: सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत सीसीआयच्या नीता संघवींनी प्रभावी विजयासह आपली मोहीम सुरू केली.

 

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI)च्या कोर्टवर सुरू झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सोमवारी पहिल्या टेबलवर झालेल्या लढतीत नीता संघवींनी उमेश मराठेचा 3-1 (50-20, 30-54, 40-14, 61-45) असा पराभव करत विजयी सलामी दिली.

 

अन्य खेळाडूंच्या दमदार कामगिरीने रंगत

खार जिमखान्याच्या निखिल सैगलनेही दमदार सुरुवात करत सुयोग मुकादमला 3-0 (62-9, 69-0, 55-17) असे सहज पराभूत केले.

 

इब्राहिम शेखने यश रूंगटावर सरळ 3-0 (47-29, 67-47, 53-29) असा विजय मिळवला.

 

चौथ्या टेबलवर रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अविनाश गायकवाडने पहिल्या दोन फ्रेम गमावूनही शानदार पुनरागमन करत मिथुन मर्चंटचा 3-2 (43-52, 39-48, 55-49, 72-43, 51-11) असा पराभव केला.

 

निकाल - पात्रता फेरी 1:

नीता संघवी विजयी वि. उमेश मराठे 3-1 (50-20, 30-54, 40-14, 61-45),

इब्राहिम शेख विजयी वि. यश रूंगटा 3-0 (47-29, 67-47, 53-29)

निखिल सैगल विजयी वि. सुयोग मुकादम 3-0 (62-9, 69-0, 55-17)

अविनाश गायकवाड विजयी वि. मिथुन मर्चंट 3-2 (43-52, 39-48, 55-49, 72-43, 51-11)

कल्पेश मेवाडा विजयी वि. डी. प्रग्नेश 3-1 (80-31, 47-67, 67-47, 62-30)

 


Post a Comment

0 Comments