Type Here to Get Search Results !

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत विकास धारियाची आगेकूच


 

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत विकास धारियाची आगेकूच

मुंबई: शिवाजी पार्क जिमखाना आयोजित, सारस्वत बँक पुरस्कृत १६ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत मुंबईच्या अव्वल मानांकन प्राप्त विकास धारियाने सहज आगेकूच करत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पुण्याच्या सुखबिंदर सिंग कटानोरियाला २३-१०, २१-९ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून चौथ्या फेरीत धडक मारली.

 

स्पर्धेतील इतर सामन्यांमध्येही काही रोमांचक चकमकी पाहायला मिळाल्या. मुंबईच्या महम्मद घुफ्रानने सुशांत वैराटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला, तर नांदेडच्या महम्मद वाजिद पाशाने शाहनवाज शेखला तिसऱ्या सेटमध्ये हरवत विजयी मजल मारली. रायगडच्या आतिष कल्याणकरने मुंबई उपनगरच्या जावेद शेखवर तीन सेटच्या लढतीत मात करत पुढील फेरी गाठली.

 

पुरुष एकेरी गट - तिसऱ्या फेरीचे निकाल:

विकास धारिया (मुंबई) वि. सुखबिंदर सिंग कटानोरिया (पुणे)२३-१०, २१-९
महम्मद घुफ्रान (मुंबई) वि. सुशांत वैराट (मुंबई)२५-१४, २५-९
जितेश कदम (मुंबई उपनगर) वि. जयवंत मोरे (मुंबई)२५-७, २५-४
आतिष कल्याणकर (रायगड) वि. जावेद शेख (मुंबई उपनगर)८-२५, २२-१६, २५-९
जितेंद्र काळे (मुंबई) वि. अथर्व तेलंगी (पुणे) २५-१६, २५-१८
महम्मद वाजिद पाशा (नांदेड) वि. शाहनवाज शेख (मुंबई)२५-१६, १३-२१, २५-८
योगेश परदेशी (पुणे) वि. मिलिंद कुलकर्णी (ठाणे)२५-०, २५-७
राजेश गोहिल (रायगड) वि. मंगेश कासारे (मुंबई)२५-१७, २५-०
नईम अखतर अन्सारी (जळगाव) वि. सोहम जाधव (मुंबई)२५-५, २५-६
सचिन पवार (पालघर) वि. अश्रफ खान (रायगड)२२-१६, १६-२५, १९-७
मोहसीन शेख (मुंबई उपनगर) वि. भारत कोळी (मुंबई)११-१६, १४-९, २५-६

स्पर्धेतील पुढील फेर्यांमध्ये आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील आघाडीचे खेळाडू विजेतेपदासाठी जोरदार झुंज देत आहेत.


Post a Comment

0 Comments