Type Here to Get Search Results !

गिरनार आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धा अंतिम फेरीत कोकिलाबेन विरुद्ध टाटा, वानखेडेवर रंगणार महामुकाबला!

 


गिरनार आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धा

अंतिम फेरीत कोकिलाबेन विरुद्ध टाटा,

वानखेडेवर रंगणार महामुकाबला!

 

मुंबई: गिरनार आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धेच्या एलाईट ग्रुपच्या अंतिम फेरीत कोकिलाबेन हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठेच्या वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगेल.

 

टाटाचा लिलावतीवर सहज विजय!

उपांत्य फेरीत टाटा हॉस्पिटलने लिलावतीवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टाटाच्या विजयात शैलेश श्रीखंडे (६५) आणि नरेश सरदार (४०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत दशरथ वलोदोराने ३ आणि खिमजी मकवानाने २ बळी मिळवत लिलावतीला मोठी धक्का दिला.

लिलावतीसाठी संदीप कणसेने ४५, रुपेश कोंडाळकरने २० धावा केल्या, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

 

कोकिलाबेनने नानावटीला रोखले!

दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोकिलाबेन हॉस्पिटलने नानावटी संघावर ११ धावांनी विजय मिळवला. कोकिलाबेनसाठी अल्केत तांडेलने ४३ नाबाद, संकेत केणीने ३५ आणि प्रतीक शाहने २६ धावा फटकावत संघाचा डाव मजबूत केला. गोलंदाजीत चिन्मय घरत आणि देवेंद्र भानसे यांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेत नानावटीच्या फलंदाजीला धक्का दिला.

 

नानावटी संघाच्या प्रतीक पाताडेने भेदक गोलंदाजी करत २१ धावांत ५ बळी मिळवले, तर फरहान काझी (४३) आणि किशोर कुयेस्कर (३८) यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले.

 

वानखेडेवर अंतिम सामना – कोण जिंकेल प्रतिष्ठेचा किताब?

आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष १३ फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याकडे आहे. कोकिलाबेन संघाच्या अचूक फलंदाजीला टाटाच्या भेदक गोलंदाजीची जोरदार टक्कर मिळणार आहे. हा सामना कोण जिंकणार? प्रतिष्ठेच्या विजेतेपदासाठी कोणता संघ बाजी मारणार? याचे उत्तर अंतिम सामन्यानंतरच मिळेल! 🏏🔥

 


Post a Comment

0 Comments