Type Here to Get Search Results !

प्रकाश पुराणिक स्मृती टी-२० स्पर्धेस ४ फेब्रुवारीपासून!


 

प्रकाश पुराणिक स्मृती टी-२० स्पर्धेस ४ फेब्रुवारीपासून!

 

मुंबई: महिला क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला नवा आयाम देणारी स्व. प्रकाश पुराणिक स्मृती टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून शिवाजी पार्क मैदानावर रंगणार आहे. माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित केली जात आहे.

 

स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ८:३० वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नाणेफेकीच्या कौलाने होणार आहे. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, जनरल सेक्रेटरी अभय हडप आणि अपेक्स कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

स्पर्धेतील रोमांचक लढती – १६ संघांमध्ये चुरस!

या प्रतिष्ठेच्या टी-२० स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजवाडी क्रिकेट क्लब, फोर्ट यंगस्टर्स, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिसर स्पोर्ट्स क्लब, ग्लोरियस क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, माटुंगा जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, स्पोर्टिंग युनियन क्लब आणि पालघर-डहाणू स्पोर्ट्स या १६ संघांचा समावेश आहे.

 

स्पर्धेतील उद्घाटन सामना दिलीप वेंगसरकर फाउंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स यांच्यात रंगणार आहे. अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर होणार आहे.

 

रोख पारितोषिके आणि पुरस्कारांची मोठी रक्कम!

स्पर्धेतील विजेत्या संघाला ५०,०००/- आणि चषक, उपविजेत्या संघाला २५,०००/- आणि चषक, तर उपांत्य उपविजेत्या दोन्ही संघांना प्रत्येकी १५,०००/- पुरस्कार मिळणार आहे.

याशिवाय,
🏆 सर्वोत्कृष्ट खेळाडू:१०,०००/-

🏏 उत्कृष्ट फलंदाज:,०००/-

🔥 उत्कृष्ट गोलंदाज:,०००/-

🌟 उदयोन्मुख खेळाडू:,०००/-

 

महिला क्रिकेटच्या चमकदार भविष्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, क्रिकेटप्रेमींनी या रंगतदार सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार महेश शेट्ये यांनी केले. 🏏🔥


Post a Comment

0 Comments