सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा 2025
निखिल सैगलचा पार्थ शहावर विजय
मुंबई, 2 मार्च: सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या अखिल भारतीय सीसीआय स्नूकर क्लासिक 2025 स्पर्धेत, निखिल सैगलने पार्थ शहावर 4-2 असा विजय मिळवून मुख्य फेरीत स्थान मिळवले.
निखिलने या सामन्यात सातत्यपूर्ण खेळाची दाखल दिली. पहिली
फ्रेम गमावूनही त्याने मानसिक दृढतेचा ठसा सोडत पार्थ शहावर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. सामन्यात त्याने तीन उत्कृष्ट
ब्रेक नोंदवले. विशेषतः तिसर्या फ्रेममध्ये नोंदवलेला 59
गुणांचा ब्रेक
हा सर्वात उत्कृष्ट ठरला. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या
फ्रेममध्ये अनुक्रमे 38 आणि 40
गुणांसह
विजय मिळवत, मुख्य फेरीत प्रवेश केला.
यासोबतच, ऋषभ जैन आणि अभिषेक मोरे या दोघांनीही आपल्या सामन्यांमध्ये सातत्य राखताना
तिसर्या फेरीत 4-0 अशा फरकाने विजय मिळवला. ऋषभ जैनने
पमुला अविनाशचा 53-10, 56-42, 70-17, आणि 68-28 अशा फरकाने पराभव केला. त्याचप्रमाणे अभिषेक मोरेने सर्विक
श्रीवास्तवचा 69-49,
72-8, 75-62 आणि 53-36
अशा गुणांमध्ये पराभव करत पुढे बढत केली.
निकाल - पात्रता फेरी 3:
रोहन कोठारे विजयी वि. ऋषभ पंचमिया 4-1 (69(49)-34, 57-49,
71-22, 46-77, 70-39)
निखिल सैगल विजयी वि. पार्थ शहा 4-2 (31-62, 70-31,
85(59)-0, 40-63, 61(38)-10, 75(40)-23)
ऋषभ जैन विजयी वि. पमुला अविनाश 4-0 (53-10, 56-42,
70-17, 68-28)
अभिषेक मोरे विजयी वि. सर्विक श्रीवास्तव 4-0 (69-49, 72-8, 75-62,
53-36)
इब्राहिम शेख विजयी वि. कल्पेश मेवाडा 4-1 (64-16, 21-56, 63-2,
62-52, 63-58)
दुसरी फेरी:
मितेश विजयी वि. दर्शन शाह 3-1 (46-44, 46-35,
12-54, 62-25)
प्रतीक ठक्कर विजयी वि. मोहम्मद सिद्दीकी 3-0 (70-63, 64-42,
75-41)

Post a Comment
0 Comments