Type Here to Get Search Results !

मुंबई श्रीचा धमाका ७ मार्चला - २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग


 

मुंबई श्रीचा धमाका ७ मार्चला - २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग

 

मुंबई, दि.२ (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठव क्षेत्रातील सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका ७ मार्चला अंधेरी पश्चिमेतील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे.

 

यंदाच्या स्पर्धेची गाज निर्माण करणार्‍या या थरारक स्पर्धेतील विजेत्यांना मान-सन्मान प्रदान केला जाणार असून, त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखा दर्जा देण्यात आला आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनाचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी याबाबत माहिती दिली.

 


२५० खेळाडूंचा सहभाग, शानदार बक्षिसे

मुंबई श्री म्हणजे फक्त एक स्पर्धा नाही, तर शरीरसौष्ठवपटूंना श्रीमंत करणारी स्पर्धा! यंदाच्या स्पर्धेत मुख्य फेरीतील ८ गट, फिजीक स्पोर्ट्सचे २ गट आणि महिलांचा १ गट असे ११ गट असतील, आणि त्यात सुमारे २५० खेळाडू सहभाग घेतील. प्रमुख खेळाडूंमध्ये संदीप सावळे, गणेश उपाध्याय, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे आणि अरुण नेवरेकर यांचा समावेश आहे. विजेत्याला सवा लाखाचे इनाम दिले जाणार आहे, तसेच द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाईल.

याशिवाय, प्रत्येक गटातील अव्वल पाच खेळाडूंना १०,,,,२ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. पुढील पाच क्रमांकांना १,००० रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळेल.

 

फिजीक स्पोर्ट्स आणि महिलांचे शरीरसौष्ठव

शरीरसौष्ठवाच्या पारंपरिक गटासोबतच फिजीक स्पोर्ट्स आणि महिला शरीरसौष्ठव यांच्याशी संबंधित गटांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये शंभराच्या आसपास खेळाडू सहभागी होणार आहेत. यामुळे या गटाला दोन भागांत विभागले गेले आहे. तसेच, महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस मुंबई हा प्रतिष्ठित किताबासाठी रेखा शिंदे आणि किमया बेर्डे, ममता येझरकर, राजश्री माहिते, रिद्धी पारकर, आणि के लविना यांच्याशी कडक लढत होईल.

 

संपर्क माहिती

स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू सुनील शेगडे (९२२३३४८५६८), राजेश निकम (९९६९३६९१०८), राम नलावडे (९८७०३०६१२७), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), विजय झगडे (९९६७४६५०६३), जयदीप पवार (८०८०८०९४३८), गिरीश कोटियन (७७३८५४५२३०) आणि सुभाष जाधव (९००४३१३४३९) यांच्याशी संपर्क साधू शकता.

 


Post a Comment

0 Comments