आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अद्या बाहेतीला
कांस्यपदक
परभणी, वडोदरा, गुजरात येथे झालेल्या जागतिक युवा टेबल टेनिस मालिकेत
परभणीच्या अद्या पूजा महेश बाहेतीने कांस्यपदक पटकावून परभणी जिल्ह्याचे आणि
देशाचे नाव उज्ज्वल केले. अद्या बाहेतीने भारताचे प्रतिनिधित्व करत ११ वर्षे
वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. उपांत्य फेरीत अवनी दुवा या
खेळाडूसोबत ती सामना करत असताना निसटत्या फरकाने पराभूत झाली (11-3,
11-8, 7-11, 9-11, 9-11). तरीही
तिने कांस्यपदक मिळवून देशासाठी महत्त्वपूर्ण पदकाची कमाई केली.
अद्याच्या यशामध्ये तिच्या कष्टांची आणि सातत्याची मोठी
भूमिका आहे. ती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र, परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्यासोबतच
अनिल बंदेल,
सचिन पुरी,
असद आली,
अजय कांबळे
यांचे मार्गदर्शन तिला मिळाले आहे. ऐश्वर्या पाटील फिजिओ म्हणून अद्याच्या पाठीशी कार्य करत आहेत. अद्या
स्कॉटिश अकॅडमी
या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी आहे.
अद्याच्या या यशाबद्दल अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी
तिला अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस
संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस,
संजय कडू,
ॲड. अशीतोष पोतनीस,
आशिष बोडस
यांच्यासह अनेक क्रीडा पदाधिकाऱ्यांनी तिच्या यशाबद्दल
कौतुक केले.
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे,
राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय
मुंढे, कल्याण
पोले,
क्रीडा अधिकारी ननाकसिंह बस्सी,
सुयश नाटकर,
रोहन औढेंकर,
परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर
वरपुडकर, जिल्हा
सचिव गणेश माळवे, डॉ. माधव शेजुळ, संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर,
पवन कदम,
पियूष रामावत,
तुषार जाधव,
सूरज भुजबळ,
रोहित जोशी,
साक्षी देवकाते,
भक्ती मुक्तावार
आणि इतर वरिष्ठ खेळाडूंनी तिचे अभिनंदन केले आणि तिला
शुभेच्छा दिल्या.
अद्याच्या या अभूतपूर्व यशामुळे परभणी जिल्ह्याच्या
क्रीडाप्रेमींना अभिमान आहे आणि तिच्या आगामी स्पर्धांसाठी सर्वांना तिच्या कडून
आणखी मोठ्या यशाची आशा आहे.

Post a Comment
0 Comments