Type Here to Get Search Results !

५८ वी सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयुष, तनया, रुद्र, निधीला अग्र मानांकन




 

५८ वी सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

आयुष, तनया, रुद्र, निधीला अग्र मानांकन

 

मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने आयोजित ५८ वी सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा ९ मार्च २०२५ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेत १२ वर्षांखालील मुले व मुली एकेरी आणि १४ वर्षांखालील मुले व मुली एकेरी अशा ४ गटांमध्ये खेळविण्यात येईल. या स्पर्धेत १२ जिल्ह्यांतील एकंदर ८६ स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या ३ विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशन च्या वतीने चषक आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील खेळाडूंच्या निवास व्यवस्थेसोबतच चहा, पाणी आणि भोजनाची व्यवस्था देखील असोसिएशनने केली आहे.

स्पर्धेतील मानांकन:

१४ वर्षाखालील मुले:

1.    आयुष गरुड (पुणे), 2. रुद्र गवारे (मुंबई), 3. वेद ब्रम्हे (पुणे), 4. प्रसाद माने (ठाणे)

 

१४ वर्षाखालील मुली:

1.    तनया पाटील (पुणे), 2. स्वरा मोहिरे (रत्नागिरी), 3. ग्रीष्मा धामणकर (मुंबई), 4. स्वरा कदम (रत्नागिरी)

 

१२ वर्षाखालील मुले:

1.    रुद्र इंगळे (पुणे), 2. भरत सावंत (सिंधुदुर्ग)

 

१२ वर्षाखालील मुली:

1.    निधी सप्रे (रत्नागिरी), 2. दिव्या राणे (सिंधुदुर्ग)

 


Post a Comment

0 Comments