Type Here to Get Search Results !

रविवारी चेंबुरमध्ये उदयन्मुख खेळाडू, ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक, क्रीडा कार्यकर्ते गुणगौरव समारंभ


 रविवारी चेंबुरमध्ये उदयन्मुख खेळाडू, ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक, क्रीडा कार्यकर्ते गुणगौरव समारंभ


मुंबई:
येत्या रविवारी, ९ मार्च रोजी चेंबूर, टिळकनगर येथील युतोपिया सभागृहात क्रीडावेधच्या तर्फे उदयन्मुख खेळाडू, ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते १.०० दरम्यान होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मनोज कोटक हे असतील.

 

समारंभात १५ विविध खेळांमधील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार आहे. क्रीडावेधच्या माध्यमातून बृहन्मुंबई विभागातील विविध क्रीडा संघटनांना एकत्रित करून बृहन्मुंबई विभागाचा क्रीडा विकास साधण्यासाठी माजी खासदार मनोज कोटक यांनी संकल्प सोडला आहे.

 

कोणत्याही स्पर्धेत प्रथम तीन स्थानांवर येणाऱ्या खेळाडूंना पदक आणि रोख रक्कमेने सन्मानित केलं जातं, पण त्यानंतरच्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना प्रोत्साहन देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या मेहनतीला ओळखून त्यांना पुढील स्पर्धेत सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी उत्तेजन देणं महत्त्वाचं आहे, असं मत माजी खासदार कोटक यांनी व्यक्त केलं.

 

क्रीडा क्षेत्रातील दीर्घकाळ कार्यरत असलेल्या संघटकोंना, प्रशिक्षकांना आणि कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान देण्याचा उद्देश क्रीडावेधने ठेवला आहे. क्रीडा चळवळीचा पाया भक्कम करण्यासाठी अशा कार्यक्रमांचा महत्त्वाचा वाटा आहे. आगामी तीन ते चार वर्षांमध्ये बृहन्मुंबई विभागाच्या क्रीडा कामगिरीचा आलेख उंचावेल, अशी आशा क्रीडावेधचे अध्यक्ष मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे.

 

क्रीडावेडमध्ये क्रीडाप्रेमींना मिळणार खास संधी

हा समारंभ केवळ क्रीडाप्रेमींना प्रेरणा देणारा नसेल, तर क्रीडा क्षेत्रातील विविध  दिग्गजांचा सन्मान करून क्रीडा चळवळीला एक नवा जोर मिळवून देण्याचा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

Post a Comment

0 Comments