कुर्ला येथे रंगणार शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धा
मुंबई: शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने कुर्ला पश्चिम स्टेशनजवळील
गांधी मैदानात शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. जयशंकर चौक क्रीडा मंडळ आणि
गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई उपनगर कबड्डी
असोसिएशनच्या मान्यतेने या भव्य स्पर्धेचे आयोजन ८ आणि ९ मार्च 2025
रोजी सायंकाळी करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष गट मध्ये अंबिका सेवा मंडळ कुर्ला,
लाल बत्ती क्रीडा मंडळ विक्रोळी,
भानवे अकॅडमी चुनाभट्टी, टागोर नगर क्रीडा मंडळ विक्रोळी,
शितलादेवी स्पोर्ट्स क्लब चेंबूर,
शूर संभाजी क्रीडा मंडळ कुर्ला,
श्री साई स्पोर्ट सेंटर कांजूरमार्ग यासारखे दिग्गज संघ
आपले भाग्य आजमावणार आहेत.
तर द्वितीय श्रेणी पुरुष गट मध्ये हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला,
पंढरीनाथ सेवा मंडळ चुनाभट्टी,
जाणता राजा क्रीडा मंडळ कुर्ला,
छावा बॉईज कुर्ला, मिलिंद सेवा मंडळ चुनाभट्टी, भरारी स्पोर्ट्स क्लब चुनाभट्टी,
नवजवान क्रीडा मंडळ चुनाभट्टी आणि लोकमान्य शिक्षण संस्था
चेंबूर यांसारख्या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल.
स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके दिली जातील. याशिवाय, सर्वोत्तम वैयक्तिक खेळाडूंनाही विशेष बक्षीसे प्रदान करण्यात येतील. कबड्डीप्रेमींसाठी ही एक शानदार संधी असेल.

Post a Comment
0 Comments