आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघ विजेते!
भारताचे हे पाचवे जेतेपद!
मुंबई: भारताच्या महिला कबड्डी संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व
सिद्ध करत आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेतेपद पटकावले आहे. तेहरान, इराणमध्ये
झालेल्या सहाव्या आशियाई महिला कबड्डी स्पर्धेत भारताने इराणला ३२-२५ अशा मोठ्या
फरकाने हरवून या स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवले.
फक्त एकदाच दक्षिण कोरिया संघाने या स्पर्धेचे विजेतेपद
जिंकले आहे, परंतु भारतीय महिला संघाने आपल्या दमदार खेळाने पुन्हा एकदा
स्पर्धेतील विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
संघनायिका सोनाली शिंगटे, पूजा यांच्या धारदार चढाया आणि
साक्षी शर्मा, ज्योती यांच्या जबरदस्त पकडीमुळे भारताने या विजयासह
अजिंक्यपदावर आपले वर्चस्व कायम राखले.
या स्पर्धेत एकूण सात देशांच्या संघांचा सहभाग होता.
भारताचा समावेश अ-गटात होता, ज्यात बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया संघ होते. साखळी फेरीत भारताने सर्व
सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि अव्वल स्थानावर राहिला. उपांत्य सामन्यात भारताने
नेपाळला ५६-१८ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
तेहरानला ही स्पर्धा आयोजनाची दुसरी संधी मिळाली आहे.
यापूर्वी २००७ साली देखील इराणमध्ये ही स्पर्धा झाली होती. २०२५ मध्ये ही ऐतिहासिक
स्पर्धा पुन्हा इराणमध्ये पार पडली आणि भारतीय महिलांनी आपले गोल्डन विजय निश्चित
केला.
विजयावर महिलांचे सामूहिक कौतुक
भारताच्या विजयावर सर्वांचाच अभिमान आहे. "या
विजयानंतर एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, भारतीय महिला कबड्डी खेळात अजूनही अग्रस्थानी आहे," असे
संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडू यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments