शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2025
महाराष्ट्रातील 159 क्रीडावीरांचा गौरव
ऑलिम्पिकसाठी सज्जतेचे राज्यपालांचे आवाहन!
पुणे : "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या
मेहनतीला मिळणारी राजमान्यता" असे गौरवोद्गार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते,
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात
2022-23 व 2023-24
या दोन वर्षांतील 159
क्रीडावीरांना
सन्मानित करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त :
शकुंतला खटावकर – माजी राष्ट्रीय कबड्डीपटू व संघटक
उल्लेखनीय पुरस्कारार्थी :
सचिन खिलारी – पॅरा ऑलिंपिक पदक विजेता
आदिती स्वामी, ओजस देवतळे – जागतिक विजेते (आर्चरी)
खो खो ला मिळालेले पुरस्कार :
प्रवीण बागल (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक)
प्रियांका इंगळे व सुयश गरगटे (२०२२-२३)
गौरी शिंदे व ऋषिकेश मुर्चावडे (२०२३-२४)
दिनेश लाड (क्रिकेट)
राज्यपालांचे प्रेरणादायी विचार :
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2036 च्या ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी करत आहेत. महाराष्ट्रातील
खेळाडूंनी आतापासूनच सज्ज व्हावे. विकसित भारताचा विचार करताना ऑलिंपिकमध्येही
सर्वोत्तम पदके मिळवण्याची ध्येयदृष्टी ठेवली पाहिजे."
त्यांनी पुढे राज्यातील 36
जिल्ह्यांमध्ये क्रीडा
संकुलांची उभारणी, शाळा-कोलेजांनी विद्यार्थ्यांना “खेळ म्हणजे करिअर” म्हणून प्रेरित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांचा शब्द :
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शिवछत्रपती पुरस्कार प्रत्येक खेळाडूच्या परिश्रमांना
मिळणारी मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले खेळाडू यशस्वी व्हावेत यासाठी
प्रशिक्षण, फिजिओ,
प्रशिक्षकांसह परदेश दौऱ्याची सोय केली जात आहे."
ते पुढे म्हणाले, "पारितोषिक रक्कम वाढवली असून थेट सरकारी नियुक्त्यांद्वारे
खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील खेळासाठी पायाभूत सुविधा
तालुक्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत."
अजित पवार यांची मनमोकळी प्रतिक्रिया :
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
"दरवर्षीचा पुरस्कार हा त्याच वर्षी
व्हावा,
ही माझी क्रीडामंत्र्यांना विनंती आहे. पुरवणी मागणीत
क्रीडा विभागाला वाढीव निधी देण्यात येईल. तुम्ही खेळाडू घडवा,
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत."
राज्यपालांनी यावर चटकन उत्तर देत म्हटले,
"पवारजी,
वेळेचा शिष्टाचार पाळलात, पण क्रीडा विभागाला निधी देताना कुठलाही शिष्टाचार पाळू
नका!" – आणि
संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
क्रीडामंत्र्यांचा संदेश :
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,
"प्रत्येक खेळाडूच्या नावासमोर 'शिवछत्रपती' हे नाव जोडले जाणार आहे. हे नाव आयुष्यभर त्यांना अभिमानाने
वागवायला लावेल." त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना
अधिक बळकटी देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :
दोन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम भव्य, प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा एक आदर्श उपक्रम ठरला.
शिवछत्रपती पुरस्काराचा हा सोहळा महाराष्ट्रातील
क्रीडाजगतात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिकसारख्या
जागतिक स्पर्धांसाठी सज्ज होत आहे, हे स्पष्ट दिसून आले!
Post a Comment
0 Comments