Type Here to Get Search Results !

आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धा भूपेन लालवानीच्या नाबाद खेळीवर पाणी फेरले बॉम्बे जिमखानाचे आव्हान संपुष्टात


आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धा

भूपेन लालवानीच्या नाबाद खेळीवर पाणी फेरले

बॉम्बे जिमखानाचे आव्हान संपुष्टात

 

मुंबई : यजमान बॉम्बे जिमखाना संघाचे आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आव्हान फारच थोडक्यात संपुष्टात आले, कारण क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) संघाने त्यांना अवघ्या २ धावांनी पराभूत केले.

 

कर्णधार भूपेन लालवानीने नाबाद ८५ धावांची झुंजार खेळी करताना एकाकी झुंज दिली. ६२ चेंडूंतील या खेळीत त्यांनी ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. मात्र, अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. सुमैर झवेरी (३३) आणि ओंकार जाधव (२८) यांनी थोडी झुंज दिली, पण विजय काही अंतरावरच राहिला. ऐश्वर्य सुर्वेने निर्णायक कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या.

 

तत्पूर्वी, सीसीआय संघाने आकाश पारकरच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १८७ धावा उभारल्या. आकाशने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ५३ धावा (४ षटकार, २ चौकार) ठोकल्या. सक्षम पराशर (३६) आणि ऐश्वर्य सुर्वे (२९) यांनी त्याला योग्य साथ दिली. बॉम्बे जिमखानासाठी दीपक शेट्टी (३/३२) आणि हर्ष तन्ना (२/४४) यांनी चांगली कामगिरी केली.

 

संक्षिप्त धावफलक:

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया१८७/८ (२० षटकांत), (आकाश पारकर ५३*, सक्षम पराशर ३६, ऐश्वर्य सुर्वे २९; दीपक शेट्टी ३/३२, हर्ष तन्ना २/४४)


बॉम्बे जिमखाना१८५/५ (२० षटकांत), (भूपेन लालवानी ८५*, सुमैर झवेरी ३३, ओंकार जाधव २८; ऐश्वर्य सुर्वे ३/३४)


निकाल: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया २ धावांनी विजयी


Post a Comment

0 Comments