आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-20
क्रिकेट स्पर्धा
जय बिस्ताच्या नाबाद ९९ धावांची खेळी
पी. जे. हिंदू जिमखान्याचा इस्लाम जिमखान्यावर दणदणीत विजय
मुंबई : जय बिस्ताच्या
जोरदार नाबाद
९९ धावांच्या खेळीच्या जोरावर पी. जे. हिंदू जिमखाना संघाने इस्लाम जिमखाना संघावर ८ विकेट राखून विजय मिळवत आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत
आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.
१८० धावांचे लक्ष्य पी. जे. हिंदू जिमखानाने अवघ्या १६.४ षटकांत २ बाद १८० धावा करून गाठले. सलामीवीर जय बिस्ता (९९ नाबाद) आणि ऋग्वेद मोरे (६४) यांनी १३.२ षटकांत १५२ धावांची जबरदस्त सलामी
देत विजय सुलभ केला. जयने अवघ्या ५० चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ९ चौकार
ठोकले. थोडक्यात त्याचे शतक हुकले. ऋग्वेद मोरेनेही
४२ चेंडूत १० चौकारांसह ६४ धावा
करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, इस्लाम जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना
२० षटकांत ६ बाद १७९ धावा
केल्या. हार्दिक तामोरे (४६), विनायक भोईर (३५), अख्तर शेख (३२) आणि प्रवीण शेट्टी (२५) यांनी संघासाठी उपयुक्त योगदान दिले. पी. जे. हिंदू
जिमखानासाठी प्रतीक मिश्रा याने प्रभावी मारा करत ३/३३ अशी कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक:
इस्लाम जिमखाना
– १७९/६ (२० षटकांत), (हार्दिक तामोरे ४६, विनायक भोईर ३५, अख्तर शेख ३२, प्रवीण शेट्टी २५; प्रतीक मिश्रा ३/३३)
पी. जे. हिंदू जिमखाना
– १८०/२ (१६.४ षटकांत), (जय बिस्ता ९९* (५० चेंडू, ६x६,
९x४),
ऋग्वेद मोरे ६४ (४२ चेंडू, १०x४);
नदीम शेख २/३६)
निकाल: पी. जे. हिंदू जिमखाना ८ विकेट राखून विजयी
Post a Comment
0 Comments