१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग
सुवेद पारकरचे सलग दुसरे शतक
शिवाजी पार्क वॉरियर्स गटात अव्वल
मुंबई : शिवाजी पार्क वॉरियर्स संघाचा स्टार फलंदाज
सुवेद पारकर
याने सलग दुसऱ्या सामन्यात झळकावलेले शतक हे संघाच्या गटात
अव्वल स्थान मिळवण्यामध्ये निर्णायक ठरले. या सामन्यात त्यांनी घाटकोपर जेट्सवर
३१ धावांनी विजय
मिळवून सुपर लीगसाठी आपले आव्हान बळकट केले.
शिवाजी पार्क वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत
२० षटकांत ३ बाद २३० धावा
केल्या.
सुवेद पारकरने आपल्या स्फोटक खेळीची पुनरावृत्ती करत
५६ चेंडूत ११८ धावा
फटकावल्या, ज्यात ११ चौकार आणि ८ षटकार होते.
त्याला उत्तम साथ मिळाली वरून लवंडेच्या (३४) आणि अग्नी
चोप्राच्या (२६) धावांमुळे. अखेर जयेश पोखरेने १० चेंडूत नाबाद ३० धावा करत डावाची
दमदार सांगता केली.
सुवेद पारकरने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत आपली
स्पर्धेतील लय सिद्ध केली आहे.
घाटकोपर जेट्सकडून प्रत्युत्तरात २० षटकांत ९ बाद १९९ धावा करण्यात आल्या.
सिद्धार्थ आक्रे (४०) आणि आर्यन पटनी (३३) यांनी काही
फटकेबाजी करत विजयाचा थोडाफार पाठलाग केला, परंतु विजय काही शक्य झाला नाही.
सचिन गुप्ता (२९/२)
आणि आश्रय सजनानी (१६/२) यांनी अचूक गोलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामन्याच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पुन्हा एकदा सुवेद
पारकरच्या नावावर गेला, आणि विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेचे निवड समिती प्रमुख
संजय पाटील यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
सुपर लीगमध्ये शिवाजी पार्क वॉरियर्स अव्वल
प्राथमिक साखळीतील सर्व संघांचे सामने पार पडल्यानंतर
गुणतालिकेचे चित्र असे होते:
संघाचे नाव |
गुण |
नेट रन रेट |
शिवाजी पार्क वॉरियर्स |
६ |
+०.७९२ |
मुंबई पोलीस सिटी रायडर्स |
६ |
+०.५९४ |
ठाणे मराठाज |
४ |
+१.११० |
घाटकोपर जेट्स |
२ |
-०.५९५ |
बांद्रा हिरोज |
२ |
-१.६४५ |
या गुणानुसार शिवाजी पार्क वॉरियर्स,
मुंबई पोलीस सिटी
रायडर्स, ठाणे
मराठाज आणि घाटकोपर जेट्स हे चार संघ सुपर लीगसाठी पात्र ठरले.
सुपर लीगचे सामने २२ एप्रिलपासून मुंबई पोलीस जिमखाना,
मारिन ड्राईव्ह येथे
सुरू होतील.
सुपर लीगमधील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना ३० एप्रिल रोजी पोलीस जिमखाना येथेच होणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
शिवाजी पार्क वॉरियर्स विरुद्ध घाटकोपर जेट्स
शिवाजी पार्क वॉरियर्स – २० षटकांत ३ बाद २३०
(सुवेद पारकर ११८, वरून लवंडे ३४, अग्नी चोप्रा २६, जयेश पोखरे नाबाद ३०; सिल्वेस्टर डिसोझा ५६/२)
घाटकोपर जेट्स
– २० षटकांत ९ बाद १९९
(सिद्धार्थ आक्रे ४०, आर्यन पटनी ३३, प्रगणेश कानपिल्लेवार २६; सचिन गुप्ता २९/२, आश्रय सजनानी १६/२)
सामनावीर – सुवेद पारकर
Post a Comment
0 Comments