कोल्हापूर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
कोल्हापूरच्या रोहित चौगुलेचा चौथ्या फेरीत दणदणीत प्रवेश!
कोल्हापूर, गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, कसबा बावडा येथे शंभूराजे फ्रेंड्स सर्कल
आणि आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत
कोल्हापूरच्या रोहित चौगुलेने आपली चमकदार कामगिरी करत चौथ्या फेरीत ठसा उमटवला.
त्याने मुंबईच्या भरत कोळीला २५-६, २१-९ अशा सरळ सेट्समध्ये
पराभूत करत पुढे कूच केली.
या स्पर्धेत आणखी एक झगमगता तारा ठरला कोल्हापूरचा अवघ्या
१५ वर्षांचा महम्मद ताजीम अस्लम शेख. त्याने पुण्याच्या सुनील वाघवर व्हाईट स्लॅम
नोंदवत २१-१६, २५-२ असा दणदणीत
विजय मिळवला.
पुण्याच्या सुखबीर सिंग कटानोरियानेही आपली ताकद दाखवत
मुंबईच्या शांतीलाल जितीयावर २५-६, २५-१५ असा सरळ विजय मिळवून चौथी फेरी गाठली.
इतर ठळक निकाल:
नीलांश चिपळूणकर (मुंबई) ने समर्थ पाटील (कोल्हापूर) ला
०६-२५, २५-०, २५-० असा
हरवले.
सागर भोसले (पुणे) ने मंगेश पंडित (मुंबई उपनगर) वर २५-१६, २५-१२ असा विजय मिळवला.
संजय मणियार (मुंबई उपनगर) ने योगेश कोंडविलकर (रत्नागिरी)
ला २५-५, २५-६ ने नमवले.
प्रताप सावंत (पालघर) ने प्रथम मेहता (मुंबई) वर २४-६, २५-१५ असा सहज विजय मिळवला.
निरंजन चारी (पालघर) ने किरण लोंढे (सांगली) वर २५-१२, २५-९ असा विजय मिळवला.
फ्रांसिस फर्नांडिस (मुंबई) ने आयुष गरुड (पुणे) ला २२-१६, १८-१६ असा संघर्षपूर्ण विजय दिला.
मुनीश राजा (मुंबई उपनगर) ने जलाल मुल्ला (सातारा) वर २२-१९, १६-१५ असा विजय मिळवला.
दिनेश केदार (मुंबई) ने अख्तर इक्बाल शेख (कोल्हापूर) वर
०६-२५, २५-०, २५-१३ अशी लढत
जिंकली.
अनिल मुंढे (पुणे) ने ओंकार वडार (कोल्हापूर) वर २०-२५, २५-११, २५-४ असा
पुनरागमन करत विजय मिळवला.
छायाचित्र:
रोहित चौगुले विरुद्ध भरत कोळी यांच्या सामन्याचे.

Post a Comment
0 Comments