डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा
शेवटच्या चेंडूवर मफतलाल एससीचा थरारक विजयासह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडकावर नाव कोरले
मुंबई : अंतिम चेंडूपर्यंत रंगलेला श्वास रोखून ठेवणारा थरारक सामना
जिंकत मफतलाल
एससीने आरसीएफ टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२५ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक आपल्या नावे केला. ही स्पर्धा आरसीएफ स्पोर्ट्स क्लब आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
डीटीडीसी स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात डॅशिंग डॅशर डशरथ चव्हाणने अविश्वसनीय शतक ठोकत १०३ नाबाद धावा (४५ चेंडू,
९ चौकार,
७ षटकार)
करताना संघाला शेवटच्या चेंडूवर ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
इतर फलंदाज झटपट बाद होत असताना डशरथने संयम आणि आक्रमकतेचा
सुरेख संगम साधत फलंदाजी केली. त्याला सौरभ सिंग (३८ धावा) याने महत्त्वपूर्ण साथ दिली.
तत्पूर्वी, डीटीडीसीकडून गौतम वाघेला (६२), ओंकार घुले (५७) आणि अनिश चौधरी (३८)
यांनी झुंजार खेळी करताना संघाला मजबूत धावसंख्या उभारून
दिली. मफतलालसाठी कार्तिक मिश्रा (२/३१) आणि सौरभ सिंग (२/३२) यांनी अचूक मारा केला.
सन्मान:
सर्वोत्तम फलंदाज: अनिश चौधरी (डीटीडीसी), सर्वोत्तम गोलंदाज:
कार्तिक मिश्रा (मफतलाल), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक व
सामनावीर (Final): डशरथ चव्हाण (मफतलाल)
संक्षिप्त धावफलक :
डीटीडीसी – २०३/७ (२० षटकांत)
– (वाघेला ६२,
घुले ५७, चौधरी ३८; क. मिश्रा २/३१, स. सिंग २/३२)
मफतलाल – २०४/७ (२० षटकांत)
– (चव्हाण १०३*,
सिंग ३८; पराशर २/३३, प. मिश्रा २/४२)
निकाल: मफतलाल एससी ३ गडी राखून विजयी

Post a Comment
0 Comments