महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनतर्फे स्नेहसंमेलन व
चर्चासत्राचे आयोजन बदलापुरात १८, १९ एप्रिलला खेळविश्वातील मान्यवरांचे मार्गदर्शन
मुंबई | बदलापूर : महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात एक नवा अध्याय
लिहिला जात असून, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या
वतीने १८ व १९ एप्रिल रोजी स्नेहसंमेलन आणि चर्चासत्राचे आयोजन
बदलापूर (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. या उपक्रमात
राज्यभरातील सर्व जिल्हा सचिवांना उपस्थित राहणे अनिवार्य असून,
हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख ठळक मुद्दे :
स्थळ: एम एस ठाकूर फार्म्स, श्री समर्थ कृपा बंगलो, साऊथ इंडियन शाळेजवळ, पाचोन रोड, बदलापूर (पश्चिम)
उद्घाटन: १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता
समारोप: १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता
मार्गदर्शक वक्ते :
संजय सरदेसाई – सर कार्यवाह, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन
संजय माधव – क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंत
राजहंस मेहंदळे –
संघटनात्मक व्यवस्थापन तज्ज्ञ
डॉ. अनिरुद्ध संकपाळ – क्रीडा मानसशास्त्र व फिटनेस सल्लागार
या चर्चासत्रात पॉवरलिफ्टिंगचा राज्यातील प्रसार,
स्पर्धांचे नियोजन, खेळाडूंच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय,
तसेच आधुनिक प्रशिक्षण पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.
तसेच स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्व सदस्यांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी
मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : संजय सरदेसाई – ९८६९१३१७४४, ८६९१९८३१११
राज्यातील पॉवरलिफ्टिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या
या उपक्रमातून नवीन विचार, योजनांची बीजे रोवली जातील आणि संघटनेच्या कार्याला बळ मिळेल,
असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment
0 Comments