एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा
सागर वाघमारे व समृद्धी
घाडीगावकर अग्रस्थानी
मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन,
बोरिवली
आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने होणाऱ्या १०व्या एमसीएफ महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला
शुक्रवार, दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भव्य सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम
संघटना यांच्या मान्यतेने होणाऱ्या या मानांकित स्पर्धेत पुरुष व महिला एकेरी गटात मिळून एकूण ३०२ स्पर्धक
सहभागी होत आहेत.
स्पर्धेसाठी पुरुष गटात पुण्याचा सागर वाघमारे आणि महिला गटात ठाण्याची समृद्धी घाडीगावकर
यांना अग्र मानांकन देण्यात आले आहे.
सामने कुठे आणि केव्हा?
स्पर्धा एमसीएफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,
प्रेमनगर,
बोरिवली (पूर्व)
येथे १८, १९ व २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ दरम्यान खेळविण्यात येणार आहेत.
थेट प्रक्षेपण:
सर्व सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत युट्युब चॅनलवरून थेट
प्रसारित करण्यात येणार असून, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये धावते समालोचनही करण्यात येणार आहे.
प्रमुख मानांकन यादी :
पुरुष एकेरी गट: 1. सागर वाघमारे (पुणे), 2. विकास धारिया (मुंबई),
3. पंकज पवार (ठाणे), 4. महम्मद घुफ्रान
(मुंबई), 5. प्रशांत मोरे (मुंबई), 6. संजय
मांडे (मुंबई), 7. रिझवान शेख (मुंबई उपनगर), 8. योगेश परदेशी (पुणे).
महिला एकेरी गट: 1. समृद्धी घाडीगावकर (ठाणे), 2. आकांक्षा कदम
(रत्नागिरी), 3. मधुरा देवळे (ठाणे), 4. प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), 5. रिंकी कुमारी
(मुंबई), 6. मिताली पाठक (मुंबई), 7. श्रुती
सोनावणे (पालघर), 8. अंजली सिरीपुरम (मुंबई).
Post a Comment
0 Comments