१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग
सुवेद पारकरचे शतक, शिवाजी पार्क वॉरियर्सचा दणदणीत विजय
बांद्रा हिरोजचा पहिला विजयही नोंद
मुंबई : शिवाजी पार्क वॉरियर्स संघाचा विस्फोटक फलंदाज
सुवेद पारकर
याने अवघ्या ५९ चेंडूत १३७ धावा करत संपूर्ण मैदानाला थक्क केले आणि आपल्या संघाला
७७ धावांनी
भक्कम विजय मिळवून दिला.
ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एम.सी.सी. आयोजित १० व्या
मित्सुई शोजी टी-२० लीगमधील या साखळी सामन्यात शिवाजी पार्क वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत ६ बाद २८०
धावांचा डोंगर रचला. ही यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ठरली.
सुवेदला साथ लाभली हार्दिक तामोरेच्या ६८ धावांची,
ज्याने ३७ चेंडूत ७ चौकार व ५ षटकार ठोकले. दोघांनी मिळून
१५.३ षटकांत १५३ धावांची भक्कम सलामी दिली.
नंतर अग्नी चोप्रा (२६) आणि तानुश कोटियन (३१) यांनी सुवेदसोबत महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. शेवटच्या
षटकात श्रेयांश बोगरने ३ बळी घेत नुकसान टाळले नाही तर ३०० धावांचीही शक्यता होती.
बांद्रा हिरोजने प्रत्युत्तरात २० षटकांत ८ बाद २०३ धावा
केल्या. मुकेश गुप्ता (नाबाद ६०) आणि प्रयाग भाटी (३३) यांनी प्रयत्न केला,
पण हे आव्हान फारसे गाठता आले नाही.
शिवाजी पार्कसाठी सचिन गुप्ता (३९/३), शिवम यादव (२२/२) आणि देव पटेल (१७/२) यांनी अचूक गोलंदाजी केली.
सामनावीर पुरस्कार अर्थातच सुवेद पारकरलाच बहाल करण्यात आला.
बांद्रा हिरोजचा पहिला विजय - ठाणे मराठाजवर मात
त्याच दिवशी सकाळच्या सत्रात बांद्रा हिरोज संघाने स्पर्धेतील आपला पहिला विजय
मिळवला. ठाणे मराठाजवर ४ विकेट्सनी विजय मिळवत त्यांनी आत्मविश्वास मिळवला.
ठाणे मराठाजने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १७१ धावा केल्या. सिद्धांत अधटराव (३२),
विराज जाधव (२७), आणि अजिंक्य बेलोसे (नाबाद २९) यांनी महत्त्वपूर्ण योगदान
दिले.
बांद्रासाठी यासिन शेख (२६/२) आणि निशांत त्रिवेदी (१४/२) यांनी अचूक फिरकी गोलंदाजी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना अमित चौहान (५४) आणि मनदीप सिंग (४३) यांनी जबरदस्त सलामी दिली. नंतर अवैस खान (२१) आणि अयाज खान (नाबाद २१) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. ठाण्यासाठी अजिंक्य
बेलोसेने ३ बळी घेतले, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
अमित चौहानला सामनावीर पुरस्कार
देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक :
शिवाजी पार्क वॉरियर्स विरुद्ध बांद्रा हिरोज
शिवाजी पार्क वॉरियर्स – २० षटकांत ६ बाद २८०, (सुवेद पारकर १३७, हार्दिक तामोरे ६८, अग्नी चोप्रा २६; श्रेयांश बोगर ४०/३)
बांद्रा हिरोज
– २० षटकांत ८ बाद २०३, (मुकेश गुप्ता नाबाद ६०, प्रयाग भाटी ३३; सचिन गुप्ता ३९/३, शिवम यादव २२/२, देव पटेल १७/२)
सामनावीर – सुवेद पारकर
बांद्रा हिरोज विरुद्ध ठाणे मराठाज
ठाणे मराठाज – २० षटकांत ९ बाद १७१, (सिद्धांत अधटराव ३२, विराज जाधव २७, अजिंक्य बेलोसे नाबाद २९; यासिन शेख २६/२, निशांत त्रिवेदी १४/२)
बांद्रा हिरोज
– २० षटकांत ६ बाद १७४, (अमित चौहान ५४, मनदीप सिंग ४३, अयाज खान नाबाद २१; अजिंक्य बेलोसे ३४/३, आर्यन दलाल २८/२)
सामनावीर – अमित चौहान
Post a Comment
0 Comments