Type Here to Get Search Results !

श्री मावळी मंडळ राज्य कबड्डीच्या रणभूमीवर ‘स्वस्तिक’ची हॅटट्रिक तर ‘शिरोडकर’चा संयमी विजय!


 

श्री मावळी मंडळ राज्य कबड्डीच्या रणभूमीवर ‘स्वस्तिक’ची हॅटट्रिक तर  ‘शिरोडकर’चा संयमी विजय!

 

ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्ष आणि १०० व्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित ७२ वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा म्हणजे अक्षरशः साहस, चपळाई आणि शौर्याचं मैदान ठरलं! या थरारक स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने तिसऱ्यांदा सलग जेतेपद पटकावून शानदार हॅटट्रिक साजरी केली, तर महिला गटात डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर संघाने संयमी खेळ करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

 

पुरुष गट : ‘स्वस्तिक’चा धडाकेबाज विजय – ३३-३०

स्वस्तिक क्रीडा मंडळाने अंतिम सामन्यात पुण्याच्या नवख्या पण ताकदवान सतेज संघाविरुद्ध ३३-३० अशा थरारक फरकाने विजय मिळवत कबड्डीप्रेमींना निखळ आनंद दिला. मनोज बांद्रे, अक्रम शेख, निलेश शिंदे व अशोक वीटकर यांच्या दमदार खेळीमुळे सामना क्षणाक्षणाला रोमांचक होत गेला. विशेषतः शेवटच्या तीन मिनिटांतील अचूक पक्कड स्वस्तिकच्या विजयाचा निर्णायक क्षण ठरला.

 


महिला गट : शिरोडकर क्लबचा संयमी आणि नेटका विजय – २६-२१

डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने शिवशक्ती महिला संघाविरुद्ध २६-२१ असा डाव खेळत विजेतेपद पटकावले. कशिश पाटील व मेघ कदम यांच्या संयमी चढाया आणि निर्णायक पक्कडींमुळे सामन्याचे पारडे शिरोडकरच्या बाजूने झुकले. विश्रांतीनंतर पूजा यादवने शिवशक्तीतर्फे जोरदार प्रयत्न केला, परंतु शिरोडकरच्या खेळाडूंनी तिला चपखल उत्तर दिले.

 

बक्षीस व गौरव – खेळाडूंचा सन्मान

स्वस्तिक क्रीडा मंडळ (पुरुष गट) – ₹1,00,000 + चषक, सतेज संघ, पुणे (पुरुष गट) – ₹75,000,

 

डॉ. शिरोडकर क्लब (महिला गट) – ₹55,000, शिवशक्ती महिला संघ – ₹44,000

 

सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)अक्षय बर्डे (स्वस्तिक), सर्वोत्तम पकडपटूअशोक वीटकर (स्वस्तिक), सर्वोत्तम चढाईपटूपृथ्वीराज शिंदे (सतेज), सर्वोत्तम खेळाडू (महिला)कशिश पाटील (शिरोडकर), सर्वोत्तम पकडपटूश्रावणी घाडीगांवकर (शिरोडकर), सर्वोत्तम चढाईपटूसमृद्धी भगत (शिवशक्ती)

 

विशेष सन्मान आणि गौरव

छत्रपती पुरस्कार विजेत्या सुवर्णा बारटक्के, पूजा यादव आणि लता पांचाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्पर्धेच्या समारोपास अमोल कीर्तिकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments