शालेय कुशलतेचा कॅरम रंगमंच सजला!
गुरुवार पासून ‘अडसूळ ट्रस्ट
सुपर लीग कॅरम स्पर्धेला’ दमदार प्रारंभ
मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त, विद्यार्थ्यांच्या कॅरम कौशल्याचा सण ठरावी अशी
‘अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा’
१ मे पासून मुंबईत उत्साहात सुरू होत आहे. १ ते ४ मे
दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश शालेय पातळीवरील
कुशाग्र बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि खेळातील सजगता यांना प्रोत्साहन देणं,
असा आहे.
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट,
सीबीयू,
व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एलआयसी ऑफ इंडिया पुरस्कृत ही स्पर्धा पूर्णतः विनाशुल्क आयोजित केली गेली आहे. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री
श्री. आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता दादर-पश्चिम येथील सीबीयू सभागृहात
उद्घाटन पार पडेल. अडसूळ प्लॅटीनम विरुद्ध एमडीसी ज्वेलर्स,
गोविंदराव मोहिते फायटर्स विरुद्ध कॅप्टन अभिजित चँम्पियन्स यांच्या सामन्याने
सुरवात होईल. १२ नामवंत संघ, ३६ राष्ट्रीय दर्जाचे शालेय खेळाडू,
आणि चार गटांत साखळी सामने ही स्पर्धा म्हणजे नवोदित कॅरमपटूंना मोठ्या मंचावरची उडी!
स्पर्धेत सहभागी असलेल्या काही खेळाडूंची
नावं:
तनया दळवी (म. गांधी विद्यालय), ध्रुव भालेराव (अँटोनियो दासिल्वा), स्वरा मोहिरे व स्वरा कदम, (रत्नागिरी), श्रीशान पालवणकर (वसई), संचिता मोहिते (कल्याण), सोहम जाधव (शारदाश्रम), सार्थक केरकर, अमेय जंगम (पार्ले टिळक) आणि बरेच चमकदार खेळाडू मैदानात
सज्ज!
‘अ’, ‘ब’,
‘क’ आणि ‘ड’ या गटांत रंगणाऱ्या साखळी सामन्यांमधून प्रत्येक गटातील
पहिले दोन संघ प्रीमियर लीग फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
विजेत्यांना मिळणार आहे – चषक, प्रमाणपत्र, टी-शर्ट,
स्ट्रायकर आणि सर्वांत महत्त्वाचं – आत्मविश्वासाचा ठेवा!
Post a Comment
0 Comments