कुस्तीच्या आखाड्याचा अभिमान! वस्ताद वसंतराव पाटील यांना
"झिंदाबाद क्रीडारत्न पुरस्कार"
"तीन दशकांच्या समर्पणाचा गौरव!”
मुंबई : कुस्ती क्षेत्रात तीन दशके अखंड योगदान
देणाऱ्या मीरा भाईंदरच्या श्री गणेश आखाड्याचे सुप्रसिद्ध वस्ताद
वसंतराव पाटील
यांना "झिंदाबाद राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार"
देऊन नुकतेच गौरवण्यात आले. प्रतिष्ठा न्यूजच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य "झिंदाबाद पुरस्कार समारंभ" सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या गौरव सोहळ्याला माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ संपादक संजय भोकरे, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांनी पाटील
यांच्या कुस्ती क्षेत्रातील अमूल्य योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि
त्यांना हा बहुमान प्रदान केला.
वसंतराव पाटील यांनी तब्बल तीन दशके कुस्ती क्षेत्रात कार्यरत राहून असंख्य मल्ल घडवले आहेत.
त्यांचे हे अविरत कार्य आणि कुस्तीचा जागर त्यांनी अखंडपणे जिवंत ठेवला आहे.
त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल श्री गणेश आखाडा आणि संपूर्ण भाईंदर वासीयांनी विशेष अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हा सन्मान म्हणजे त्यांच्या अखंड कष्टांचे आणि
कुस्तीप्रेमाच्या निष्ठेचे अधिकृत मान्यतेचे प्रतीक ठरले आहे. वस्ताद वसंतराव
पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments