Type Here to Get Search Results !

सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक स्पर्धा २०२५ निखिल घाडगे, हितेश कोटवानीचा दमदार दुसरा विजय!


 

सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक स्पर्धा २०२५

निखिल घाडगे, हितेश कोटवानीचा दमदार दुसरा विजय!

 

मुंबई : दहा लाख रुपयांच्या एकूण बक्षिसांची आकर्षक रक्कम असलेल्या सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक स्पर्धेत आज निखिल घाडगे, हितेश कोटवानी आणि रफत हबीब यांनी दमदार कामगिरी करत पात्रता फेरीत आपला दुसरा विजय नोंदवला.

 

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथील विल्सन जोन्स बिलियर्ड्स रूममध्ये रंगलेल्या सामन्यांत निखिल घाडगेने डॉ. पिरोज पटेल यांचा १९२-१५३ असा पराभव केला. दुसरीकडे, हितेश कोटवानीने आपल्या अचूक आणि सातत्यपूर्ण खेळीच्या जोरावर विवेक नारायणवर ४३०(ब्रेक्स: ८०, ५५, ५२)-२६६ असा मोठा विजय मिळवला.

 

रफत हबीबने देखील जबरदस्त फॉर्म दाखवत शुभम रंधेवर ३४८(ब्रेक्स: ७३, ६३)-२१०(६६) असा दणदणीत विजय मिळवून स्पर्धेतील आपली ताकद सिद्ध केली.

 

दरम्यान, पहिल्या फेरीत डॉ. फिरोज पटेल यांनी अगस्त्य मित्तल यांचा १७-८४, तर भूपेंद्र पंड्याने मिथिल शिंदेवर २१९-१९८ असा निसटता विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले.

 

निकाल :

(दुसरी फेरी )

निखिल घाडगे विजयी वि. डॉ. पिरोज पटेल – १९२-१५३

हितेश कोटवानी विजयी वि. विवेक नारायण – ४३०(८०,५५,५२)-२६६

रफत हबीब विजयी वि. शुभम रंधे – ३४८(७३,६३)-२१०(६६)

 

(पहिली फेरी)

डॉ. फिरोज पटेल विजयी वि. अगस्त्य मित्तल – १७-८४

भूपेंद्र पंड्या विजयी वि. मिथिल शिंदे – २१९-१९८


Post a Comment

0 Comments