Type Here to Get Search Results !

नवमित्र क्रीडा मंडळाची "सुवर्ण महोत्सवी" द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा शताब्दी स्पोर्ट्सचा सुवर्ण विजय! "स्व. दीपक वेर्लेकर चषक" आणि सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारावर शताब्दीचा ठसा

 


नवमित्र क्रीडा मंडळाची "सुवर्ण महोत्सवी" द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा

शताब्दी स्पोर्ट्सचा सुवर्ण विजय! "स्व. दीपक वेर्लेकर चषक" आणि सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारावर शताब्दीचा ठसा

 

मुंबई : वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाच्या "सुवर्ण महोत्सवी" वर्षानिमित्त आयोजित द्वितीय श्रेणी (ब गट) कबड्डी स्पर्धेत धारावीच्या शताब्दी स्पोर्ट्स संघाने शानदार कामगिरी करत "स्व. दीपक वेर्लेकर चषक" पटकावला. तसेच संघाचा प्रमुख खेळाडू निकेश महाळुंगे याने स्पर्धेतील "सर्वोत्तम खेळाडू"चा बहुमान पटकावत आपली चमक सिद्ध केली.


मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वरळी स्पोर्ट्स क्लबच्या "स्व. यशवंत साळवी मॅट" क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात शताब्दी स्पोर्ट्सने पहिल्या सत्रात एका गुणाने पिछाडीवर (१४-१५) असतानाही दुसऱ्या सत्रात तुफानी खेळ करत श्री संस्कृती प्रतिष्ठान, प्रभादेवी संघाचा २९-२४ असा पराभव केला. या विजयाबरोबरच शताब्दीने "स्व. दीपक वेर्लेकर चषक" आणि रोख ,०००/- रुपये जिंकले, तर उपविजेता संस्कृती प्रतिष्ठानने चषक आणि रोख ,०००/- रुपये स्वीकारले.



रोमांचक अंतिम सामना
सामन्याच्या सुरुवातीला शताब्दीने आक्रमक खेळ करत पहिलाच लोण मिळवून आघाडी घेतली. मात्र संस्कृती संघाने जोरदार पुनरागमन करत विश्रांतीपर्यंत एका गुणाची आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात मात्र शताब्दीने संयम राखत दुसरा लोण मिळवत पुन्हा आघाडी घेतली आणि अखेर ही आघाडी टिकवून ५ गुणांनी विजय साकारला.


निकेश महाळुंगे आणि करण जैसवालची झळाळती कामगिरी
शताब्दीच्या विजयामध्ये निकेश महाळुंगेच्या संयमी आणि अचूक चढायांचा तसेच करण जैसवालच्या निर्णायक पकडींचा मोलाचा वाटा होता. संस्कृतीच्या रोहित यादव आणि रोशन राय यांचा पहिल्या सत्रातील झंझावात दुसऱ्या सत्रात फिका पडला.


उपांत्य फेरीतील निकाल:

शताब्दी स्पोर्ट्सने ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३४-२२ असा पराभव केला.

श्री संस्कृती प्रतिष्ठानने अमर क्रीडा मंडळाचा ३०-२७ असा पराभव केला.

उपांत्य फेरी गमावलेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख ,०००/- रुपये बक्षीस मिळाले.


विशेष सन्मान:

"सर्वोत्तम चढाईपटू" - रोहित यादव (श्री संस्कृती प्रतिष्ठान)

"सर्वोत्तम पकडीपटू" - करण जैसवाल (शताब्दी स्पोर्ट्स)

दोन्ही खेळाडूंना चषक आणि प्रवासी बॅग देऊन गौरवण्यात आले.


बक्षीस वितरण समारंभात आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विलास जाधव, विलास वेर्लेकर, हरीश कारकी, राजन गवाणकर, संतोष गवाणकर, विक्रम बालन, जयराम मेस्त्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments