श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेत सन्मित्र,
शिवशंकर,
आत्माराम,
जय बजरंग संघांचे
शानदार विजय
ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्ष आणि १००
व्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय कबड्डी
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर),
विजय स्पोर्ट्स (काल्हेर, ठाणे), चेंबूर क्रीडा केंद्र (मुंबई उपनगर),
शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे), आत्माराम क्रीडा मंडळ (डोंबिवली,
ठाणे), जय बजरंग स्पोर्ट्स क्लब (ठाणे),
श्री शिवाजी उदय मंडळ (पुणे), बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर),
साई स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर) आणि श्री समर्थ क्रीडा
मंडळ (कालावार, ठाणे)
यांनी शानदार विजय मिळवला.
अटीतटीच्या सामन्यात रंगतदार विजय
पहिल्या सामन्यात बंड्या मारुती सेवा मंडळाने जय हनुमान
काल्हेर संघावर २२-२१ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला जय हनुमान
संघाकडे दोन गुणांची आघाडी होती, मात्र शुभम चौगुलेच्या आक्रमक चढायांनी बंड्या मारुती
संघाने सामन्याचे पारडे झुकवले.
दुसऱ्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळाने अशोक मंडळाचा
४२-३९ असा थरारक पराभव केला. सुरज सुतारच्या शानदार चढायांनी व लक्ष्मण सावंतच्या
पक्कडीतल्या योगदानाने सन्मित्रने सामन्याचा कौल आपल्या बाजूने वळवला. पराभूत
संघाकडून सोहम पुंडे आणि अंकित जाधव यांनी लढवय्या खेळ दाखवला.
महिला गटात स्नेहविकासचा निसटता विजय
महिला गटातील रंगतदार सामन्यात स्नेहविकास क्रीडा मंडळाने
ज्ञानशक्ती युवा संस्थेवर ३८-३५ असा निसटता विजय मिळवला. प्राची तावडेच्या शानदार
खेळामुळे मध्यंतराला स्नेहविकासने १६ गुणांची मोठी आघाडी घेतली होती. मात्र
दुसऱ्या सत्रात निधी राजोळे आणि यतिक्षा बावडे यांच्या सर्जनशील खेळीमुळे
ज्ञानशक्ती संघाने जोरदार मुसंडी मारली. अखेर स्नेहविकासने आपला अनुभव पणाला लावत
विजय मिळवला.
दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू:
महिला गट : प्राची तावडे (स्नेहविकास क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
पुरुष गट : निहार पाटील (विजय स्पोर्ट्स, काल्हेर, ठाणे)
महिला गटातील इतर सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने
नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमीचा, अमर हिंद मंडळाने संघर्ष क्रीडा संस्थेचा तर होतकरू मित्र
मंडळाने जगदंब क्रीडा मंडळाचा पराभव केला.
पुरुष गटातील अन्य सामन्यांत जय भवानी तरुण मंडळ,
अमर हिंद मंडळ, जय बजरंग स्पोर्ट्स क्लब आणि विजय स्पोर्ट्स काल्हेर यांनी
आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले.
गौरव :
छत्रपती पुरस्कारप्राप्त वीणा खवळे,
गौरव शेट्टी, निलेश साळुंखे तसेच दैनिक 'सकाळ'चे क्रीडा पत्रकार जयेंद्र लोंढे यांचा स्पर्धेदरम्यान
विशेष सत्कार करण्यात आला.



.jpeg)
Post a Comment
0 Comments