Type Here to Get Search Results !

No title


अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेची गटवारी जाहीर; १२ संघ सज्ज

 

मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट, सिबिईयु आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेची गटवारी जाहीर झाली आहे. साखळी फेरीत १२ संघांचा थरार अनुभवायला मिळणार असून, १ ते ४ मे दरम्यान दादर-पश्चिम येथे सामने रंगणार आहेत. स्पर्धेत विविध जिल्ह्यातील नामांकित ३६ खेळाडू चमकणार आहेत.

 

अ गट: आनंदराव अडसूळ प्लॅटीनम, एमडीसी ज्वेलर्स, दिलीप करंगुटकर स्ट्रायकर्स

ब गट: गोविंदराव मोहिते फायटर्स, कॅप्टन अभिजित चँम्पियन्स, आत्माराम मोरे प्रतिष्ठान

क गट: सिबिईयु वॉरीयर्स, घोषचा फेअर प्ले, राजन राणे ऑप्टीशीयन्स

ड गट: सुमती क्वीन, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, सुरेश आचरेकर फिनिशर्स

 

शालेय क्रीडा क्षेत्रात डीएसओ कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेपर्यंत विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी, को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे प्रयत्नशील आहेत.

 

या स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, रत्नागिरीच्या शिर्के हायस्कूलच्या स्वरा मोहिरे व स्वरा कदम, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, महात्मा गांधी विद्यालयाची तनया दळवी, अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेराव, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, तसेच पार्ले टिळक विद्यालयाचे सार्थक केरकर व अमेय जंगम अशा राष्ट्रीय ख्यातीच्या ३६ सबज्युनियर खेळाडूंचा कस लागणार आहे.

 

चुरशीचे सामने:

स्पर्धा १ ते ४ मे दरम्यान दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात सकाळी रंगणार असून, साखळी फेरीतून प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना प्रीमियर सुपर लीगसाठी पात्रता मिळणार आहे.

 

उत्कृष्ट पुरस्कार:

पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या या उपक्रमात सर्व सहभागी शालेय खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र, टी-शर्ट, स्ट्रायकर अशा विविध पुरस्कारांनी गौरवले जाणार आहे.


Post a Comment

0 Comments