श्री मावळी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त ७२वी
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगात
ठाणे – श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त व १००
व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे
भव्य उद्घाटन मावळी संस्थेच्या भव्य क्रीडानगरीत
मा. खासदार नरेश म्हस्के
यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सोहळ्याला
त्यावेळी विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे (कल्याण
जिल्हाप्रमुख), सुधीर कोकाटे (माजी नगरसेवक),
हेमंत पवार (ठाणे
विधानसभा शहरप्रमुख ), सुहास देसाई (अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) हे उपस्थित होते.
त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे,
उपाध्यक्ष श्री. सुनील
करंजकर , चिटणीस
श्री. रमण गोरे, उप चिटणीस श्री. संतोष सुर्वे,
सहाय्यक चिटणीस श्री.
चिंतामणी पाटील, खजिनदार श्री. रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त श्री. श्री. प्रभाकर सुर्वे,
विश्वस्त श्री. कृष्णा
डोंगरे, विश्वस्त
पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त श्री. केशव मुकणे आदी मान्यवरांची
उपस्थिती लाभली.
शतक महोत्सवाचे औचित्य साधून यंदा पुरुष व महिला गट मिळून
तब्बल १००
संघांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी छत्रपती पुरस्कार विजेते
सुनील जाधव,
मेघाली कोरगांवकर म्हसकर,
रेबीक्का गवाटे,
ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी आणि सुधीर खानोलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महिला गटात आकाश स्पोर्ट्स आणि स्फूर्ती सेवा मंडळाची
झंझावाती आगेकूच
महिला गटातील उद्घाटन सामन्यात आकाश स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर)
संघाने शिवतेज क्रीडा मंडळ (ठाणे) संघाचा ३३-२३ असा दणदणीत पराभव करत दुसऱ्या फेरीत मजल
मारली. तनिषा भद्रिके आणि धनश्री कोकाटे यांच्या प्रभावी खेळीने आकाशने मध्यंतरालाच १९-१० अशी भक्कम
आघाडी घेतली होती. पराभूत संघात संगम यादव हिने एकाकी झुंज दिली.
दुसऱ्या सामन्यात, स्फूर्ती सेवा मंडळ (ठाणे) संघाने टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर)
संघावर ५८-४४ असा प्रभावी विजय मिळवला. दीपाली पागडे
यांच्या दमदार चढायांसह नूतन चव्हाण हिने पकडीत उत्तम साथ दिली.
पुरुष गटात श्रीराम मंडळ,
जॉयकुमार स्पोर्ट्स,
पार्ले स्पोर्ट्सची
विजयी घोडदौड
पुरुष गटाच्या उद्घाटन सामन्यात ओवळी क्रीडा मंडळाने (मुंबई उपनगर)
ग्रीफिन्स जिमखाना (ठाणे)
संघाचा ३४-२८ असा नाट्यमय विजय मिळवला.
मध्यंतराला पिछाडीवर असतानाही रितिक सोनावणे व आकाश सकपाळ यांच्या शानदार कामगिरीने विजय खेचून आणला.
श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ (मुंबई शहर)
संघाने टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर)
संघावर ४८-३२ असा विजय मिळवत आगेकूच केली.
तुषार शिंदे
यांच्या आक्रमक चढायांमुळे मध्यंतरानंतर श्रीराम मंडळाने
सामन्यावर पकड मिळवली.
तिसऱ्या सामन्यात, जॉयकुमार स्पोर्ट्स क्लब (ठाणे) संघाने हनुमान क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) संघाचा ४२-२७ असा सहज पराभव केला.
दित्य चौधरी
आणि अमित मुकादम यांच्या अष्टपैलू कामगिरीने हा विजय शक्य झाला.
दिनांक २५ एप्रिल २०२५ चे ‘दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू’:
- महिला गट : तनिषा भद्रिके (आकाश स्पोर्ट्स क्लब,
मुंबई उपनगर)
- पुरुष गट : सुरज दुधाने (दत्त सेवा संघ,
मुंबई उपनगर)
इतर निकाल
महिला गट:
शिवशक्ती महिला संघ (धुळे) ४६ – २० एसआयईएस स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर)
जय भारत स्पोर्ट्स क्लब (ठाणे) ५१ – १७ बालयोगी कबड्डी संघ दहिसर (मुंबई उपनगर)
पुरुष गट:
पार्ले स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर)
५० – १५ आकांक्षा क्रीडा मंडळ (मुंबई शहर)
दत्त सेवा संघ (मुंबई उपनगर) ३८ – ३० श्री हनुमान सेवा मंडळ (ठाणे)





Post a Comment
0 Comments