Type Here to Get Search Results !

एनएससीआय बॉल्कलाइन स्पर्धा स्पर्श फेरवानीचा सनसनाटी विजय! अनुभवी निखिल ओटमवर 4-3 अशी मात


 

एनएससीआय बॉल्कलाइन स्पर्धा

स्पर्श फेरवानीचा सनसनाटी विजय! अनुभवी निखिल ओटमवर 4-3 अशी मात

 

मुंबई : चौथ्या एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेत आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा ठसा उमटवला तो स्पर्श फेरवानीने! एफ गटातील अत्यंत चुरशीच्या 'बेस्ट ऑफ सेव्हन' सामन्यात त्याने अनुभवी निखिल ओटमवर ४-३ असा थरारक विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 

वरळी येथील एनएससीआय क्लबच्या टेबलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुरुवातीपासून निखिल ओटमने आघाडी घेतली होती. पहिल्या चारपैकी तीन फ्रेम्स जिंकून निखिल ३-१ अशा मजबूत स्थितीत होता. पण त्यानंतर स्पर्शने जबरदस्त पुनरागमन करत शेवटच्या तीन फ्रेम्सवर एकहाती कब्जा मिळवत सामना पूर्णतः फिरवला. अंतिम स्कोअर ४-३ (5-77(43), 52-57, 69-42, 29-72, 79(43)-4, 65-12, 62-11) असा नोंदला गेला.

 

या थरारक सामन्याशिवाय स्पर्धेत इतर टेबलवरही रोचक लढती रंगल्या:

चौथ्या टेबलवर, रिषभ पंचमियाने अमानुल्ला शेखवर ४-२ असा विजय मिळवला. त्याने ५२ गुणांचा सुंदर ब्रेक साकारत सामन्यावर आपली पकड सिद्ध केली.

 

पहिल्या टेबलवर, अरविंद गौडने शोकीन खानचा ४-२ ने पराभव करत आपली विजयी मालिका सुरूच ठेवली. आणि एकतर्फी लढतीत पिनाक अनपने निखिल भन्साळीला ४-० ने साफ पराभूत केलं. पिनाकने ८२ गुणांचा झकास ब्रेकही साकारला.

 

या स्पर्धेतील प्रत्येक सामना रंगतदार होत असून युवा खेळाडूंच्या खेळातली चमक आणि वरिष्ठांचा अनुभव यामधील संघर्ष प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. स्पर्धेचा थरार अजून वाढणार, यात शंका नाही!


Post a Comment

0 Comments