Type Here to Get Search Results !

वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा मुंबईचा कॅरममध्ये ‘कारनामाच’! राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई महिला संघाचा थरारक विजय


वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

मुंबईचा कॅरममध्ये ‘कारनामाच’!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई महिला संघाचा थरारक विजय

 

वाशी, नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या महिला संघाने धमाकेदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबई संघाने ठाणेवर २-१ असा चुरशीचा विजय मिळवत राज्य अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

पहिल्या एकेरी सामन्यात मुंबईच्या रिंकी कुमारीने आपल्या अचूक खेळाने ठाण्याच्या मधुरा देवळेला २५-८, २५-५ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत मुंबईला विजयी सुरुवात करून दिली. मात्र दुसऱ्या एकेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने जबरदस्त पुनरागमन करत मुंबईच्या मिताली पाठकला २५-५, २५-४ असा पराभव देत सामना बरोबरीत आणला.

 

निर्णायक दुहेरी सामना तितकाच रोमहर्षक ठरला. मुंबईच्या जोडीने हा सामना २४-१२, ५-१८, २०-१७ असा थरारक विजय मिळवत जेतेपद निश्चित केले. हा सामना अंतिम सेटपर्यंत गेलेला असल्याने प्रेक्षकांनाही खिळवून ठेवणारा क्षण अनुभवता आला.

तिसऱ्या क्रमांकासाठी पालघर, पुणे आणि रत्नागिरी या संघांचे प्रत्येकी दोन गुण झाले होते. मात्र सरासरी गुणफळकाच्या आधारे पालघर संघ तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्यात यशस्वी ठरला.

 

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवणारे खेळाडू:

इक्बाल बागवान (कोल्हापूर) याने स्वप्नीलराजे शिंदे (रत्नागिरी) याला २२-६, २५-० असा पराभव दिला.

फैझुल मोमीन (सांगली) याने प्रवीण मढवी (ठाणे) याला २४-९, २५-० असे हरवले.

मेहराज शेख (नाशिक) याने दत्तप्रसाद शेंबकर (ठाणे) याला १८-८, २५-१ असा पराभव दिला.

बिपीन पांडेय (पालघर) याने किरण बोबडे (ठाणे) याला २४-१९, २५-१ ने नमवले.

वयस्कर गटातही झळकला अनुभवाचा प्रकाश:

संदेश अडसूळ (मुंबई) याने श्रीधर वाघमारे (रायगड) याला २२-१०, २५-१०

बाळकृष्ण लोखरे (पुणे) याने विश्वनाथ शिवलकर (रत्नागिरी) याला २५-६, २०-७

निरंजन चारी (पालघर) याने गणेश पाटणकर (मुंबई) याला २५-१२, २२-८

रघुनाथ वाघपंजे (मुंबई उपनगर) याने रवींद्र बच्चलवार (मुंबई) याला २५-५, २५-५

 

मुंबई महिला संघाचे चमकदार खेळाडू (डावीकडून):

सिमरन शिंदे, रिंकी कुमारी, नीलम घोडके, संघ व्यवस्थापक संजय देसाई, आयेशा खान, मिताली पाठक आणि वैभवी शेवाळे.

 

स्पर्धेतील मुंबईच्या संघाने दाखवलेली खेळातली गुणवत्ता, संयम आणि एकजुटीची भावना निश्चितच प्रेरणादायक ठरली. राज्यातील कॅरम रसिकांसाठी ही स्पर्धा एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे!


Post a Comment

0 Comments