मा. ना. गणेश नाईक यांच्या हस्ते ५९ वी राज्य अजिंक्यपद कॅरम
स्पर्धा सुरु
नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ज्युबिली
हॉलमध्ये सुरू झालेल्या ५९ व्या सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे
उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नव्या ‘एमसीए नाण्या’च्या
कौलाने आणि एका डावाने स्पर्धेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष
जितेंद्र शाह, उपाध्यक्ष
विजय एस. पाटील, मानद
सचिव विजय आर. पाटील, अरुण केदार, खजिनदार
अजित सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व राज्य कॅरम
संघटनेतर्फे सन २०२२-२३ व २०२३-२४ साली राज्य शासनाने गौरविलेल्या कॅरमपटूंना
सन्मानित करण्यात आले. त्यात विश्वविजेता संदीप दिवे,
नीलम घोडके, अभिजित त्रिपनकर, योगेश धोंगडे, आकांक्षा कदम तसेच माजी विश्वविजेते योगेश परदेशी व प्रशांत
मोरे यांचा समावेश होता.
स्पर्धेतील काही महत्त्वाचे निकाल (पुरुष सांघिक गट):
मुंबई उपनगर २ - १ नाशिक
सज्जाद शेख (मुंबई उपनगर) विजयी वि. हसन शेख – २५-१०,
९-११, २०-३
सर्फराज सय्यद (नाशिक) विजयी वि. मुनेश राजा – २५-६,
२३-५
वाजिद अन्सारी/शाहबाझ शेख (मुंबई उपनगर) विजयी वि. फिरोझ
शेख/महराज शेख – २०-२५, २२-१२, २५-४
ठाणे ३ - ० सांगली
झैदी अहमद वि. रवींद्र कांबळे – २५-०,
२५-५
पंकज पवार वि. किरण लोंढे – २५-४,
२५-५
अन्सारी बंधू वि. तिरमरे/मोमीन – २५-१,
२५-५
मुंबई ३ - ० पालघर
प्रशांत मोरे वि. सचिन पवार – २५-१,
२५-०
महम्मद घुफ्रान वि. जोनाथन बोनल – २५-९,
२०-१५
राहुल सोळंकी/वाडवलकर वि. गिरी/पांडेय – २४-११,
२५-२१
पुणे ३ - ० कोल्हापूर
अभिजित त्रिपनकर वि. ओंकार वडार – २५-४,
२५-२
सागर वाघमारे वि. रोहित चौगुले – १४-१३,
२५-४
मुंढे/रहीम खान वि. अख्तर/मंझूर – २५-१,
२५-०

Post a Comment
0 Comments