Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा जान्हवी आणि ओमची चमकदार खेळी; दुसऱ्या फेरीत मिळवले झळाळते विजय!


 

अखिल भारतीय चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

जान्हवी आणि ओमची चमकदार खेळी; दुसऱ्या फेरीत मिळवले झळाळते विजय!

मुंबई : पेडर रोडवरील रशियन हाऊस येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या ऑल इंडिया चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा चुरशीच्या वातावरणात रंगत आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत जान्हवी सोनेजी आणि ओम गडा यांनी आपल्या अचूक आणि रणनीतीपूर्ण खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

 


जान्हवी सोनेजीने काळ्या मोहर्‍यांनिशी खेळताना हेमंत इशानवर तगडी मात करत आपली ताकद दाखवून दिली. दुसऱ्या एका रोमहर्षक लढतीत ओम गडाने अवनीश शेट्टीला पराभूत करत मोठा विजय मिळवला. या दोघांची खेळी यशाच्या पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली.

 

टॉप 10 बोर्डवरील थरारक निकाल:

दक्ष जागेसिया 1 विजयी वि. जॉन पॉल सनमरी 0

आर्यन यश कापडी 1 विजयी वि. कुमार 0

अजय अग्रवाल 1 विजयी वि. अनिरुद्ध अय्यर 0

दर्श शेट्टी 1 विजयी वि. देवार्थ गज्जर 0

ओम गडा 1 विजयी वि. अवनीश शेट्टी 0

जान्हवी सोनेजी 1 विजयी वि. हेमंत इशान 0

अभिषेक पाटील 1 विजयी वि. वरद तवटे 0

मिलिंद आभा 1 बरोबरी वि. ए. कुमार 1

स्वामीनाथन वागेश 1 विजयी वि. श्राव्या गावंड 0

आझाद इराणी 1 विजयी वि. मयुरेश पारकर 0

 

ही स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवोदित खेळाडूंनी दिलेले आव्हान आणि अनुभवी खेळाडूंची चतुराई यामुळे बुद्धिबळप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.


Post a Comment

0 Comments