Type Here to Get Search Results !

५९वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा राज्य कॅरम स्पर्धेत मुंबईचा डबल धमाका! पुरुष व महिला गटात मुंबई संघाचा विजयाचा झंकार

 


५९वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

राज्य कॅरम स्पर्धेत मुंबईचा डबल धमाका!
पुरुष व महिला गटात मुंबई संघाचा विजयाचा झंकार

 

नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ५९व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईने आपली दादागिरी ठसठशीतपणे अधोरेखित केली. पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत मुंबईने राज्य कॅरमवर आपली पकड सिद्ध केली.

 

पुरुष गटाच्या सांघिक अंतिम फेरीत मुंबईने पुण्याचा २-१ अशा फरकाने पराभव केला. पहिल्या एकेरीत महम्मद घुफ्रानने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २४-१० असे चितपट करत जोरदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या एकेरीत प्रशांत मोरेने अभिजित त्रिपणकरवर २५-११, १७-१६ असा विजय मिळवत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

पुण्याला एकमेव दिलासा दुहेरीत मिळाला, जिथे अनिल मुंढे व रहीम खान या जोडीने मुंबईच्या राहुल सोळंकी व सिद्धांत वाडवलकर यांना १८-३, २४-८ असे नमवले. मात्र, तो विजय पुण्याच्या एकूण पराभवाला थोपवू शकला नाही.

 

ठाण्याचा तिसऱ्या क्रमांकासाठी झंझावात:

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला.

पंकज पवारने संजय मणियारला २०-१३, २५-१६ असे पराभूत केले.

झैद फारुकीने सज्जाद शेखला २५-३, २२-१ अशी धूळ चारली.

दुहेरीत महम्मद व समीर अंसारीच्या जोडीने मंगेश पंडित व मुनेश राजाला २५-८, २५-२२ अशी मात दिली.

 

रंगतदार एकेरी सामने:

एकेरीच्या तिसऱ्या फेरीत विविध जिल्ह्यांच्या खेळाडूंनी जबरदस्त झुंज दिली.

संजय मणियार ( मुंबई उपनगर ) वि वि अभिषेक चव्हण ( रत्नागिरी ) २५-२२, १९-१६

ओमकार नेटके ( मुंबई ) वि वि मिलन पांचाळ ( मुंबई उपनगर ) २३-१३, २०-४

संजय कोंडविलकर ( रत्नागिरी ) वि वि सुशांत वैराट ( मुंबई ) २१-१९, १२-२१, १८-११

रहीम खान ( पुणे ) वि वि राजेश रिकामने ( मुंबई ) २२-९,२५-०

महम्मद रझा ( मुंबई ) वि वि सुरेश बिस्त ( रायगड ) १०-२५, १४-७, २५-९

सलमान खान ( मुंबई ) वि वि आशुतोष गिरी ( पालघर ) २५-२, २५-२४

जावेद शेख ( मुंबई उपनगर ) वि वि  ऋषिकेश तिरमारे ( सांगली ) २५-०, २५-१

सचिन घटकांबळे ( मुंबई ) वि वि रोहित चौगुले ( कोल्हापूर ) १८-९, ०-२५, १९-५

विवेक कांबळे ( मुंबई उपनगर ) वि वि अविष्कार मोहिते (ठाणे ) १३-१६,२५-११,१९-१८

राजेश गोहिल (रायगड) वि वि  सुरज कुंभार ( मुंबई) २५-१२,२५-१९

विश्वनाथ देवरुखकर (मुंबई उपनगर) वि वि राहुल भस्मे (रत्नागिरी) १४-१८,२५-१४,२५-१

रईस शेख (जळगाव) वि वि किरण भोपनीकर (मुंबई उपनगर ) २५-०,१७-५

 

स्पर्धेतील रोमांचकतेचा आणखी एक पैलू म्हणजे आतापर्यंत झालेली १७ व्हाईट स्लॅम आणि ५ ब्लॅक स्लॅमयामुळे खेळाचा दर्जा आणि चुरस अधोरेखित झाली आहे.

 

मुंबईचा विजेता संघ (डावीकडून):

राहुल सोळंकी, प्रशांत मोरे, संजय देसाई (संघ व्यवस्थापक), सिद्धांत वाडवलकर, सलमान खान, महम्मद घुफ्रान व ओंकार टिळक.


Post a Comment

0 Comments