सर बेनेगल रामा राव 63 वी आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धा
अमेय बोथारेची अफलातून कामगिरी
एचडीएफसी बँकचा
झंझावाती विजय!
मुंबई : सर बेनेगल रामा राव 63व्या आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धेतील प्लेट गटातील
सामना एकतर्फी ठरला! एचडीएफसी बँक एससीच्या विजयात चमकदार ठसा उमटवला तो त्यांच्या
तरुण ऑफस्पिनर अमेय बोथारेने, ज्याने फक्त ५ धावांत ५ बळी घेत सामना एकहाती फिरवला आणि संघाला ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
शनिवारी झालेल्या पावसामुळे सामन्याचा फॉर्मेट संक्षिप्त
करण्यात आला होता. रविवारी ओव्हल मैदानावरील सरकारी लॉ कॉलेजच्या मैदानावर
झालेल्या या थरारक लढतीत एचडीएफसी बँकेने ८ षटकांत ५ बाद ९६ धावा केल्या. यामध्ये यश छज्जरने फटकेबाजी करत ४८ धावा करताना संघाला भक्कम आधार दिला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, अभ्युदय बँक एससीचा डाव मात्र कोलमडला. अमेयच्या भेदक
माऱ्याला सामोरे जाताना त्यांचा डाव फक्त ७.५ षटकांत ९ बाद ३९ धावा करत आटोपला. शुभ रजकनेही साथ देत २ बळी टिपले. अमेयच्या या
कामगिरीमुळे तो या सामन्याचा नायक ठरला.
इतर सामन्यांतही रंगतदार क्षण:
आयसीआयसीआय बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला ४ विकेटनी पराभूत करत शानदार विजय मिळवला. श्रेयस तांडेलची अष्टपैलू
खेळी (४१ धावा व २ बळी) विशेष ठरली.
ड्यूश बँकेने बँक ऑफ बडोदावर ७ विकेटनी विजय मिळवला. नितीन देशमुखच्या अर्धशतकासहीत चंदन
शिरवळकरच्या ४ बळींचा सामना झाला.
सिटी बँकेने कोटक महिंद्रावर १२ धावांनी मात केली. सुशांत शेट्टी व सागर चेंबूरकर यांच्या प्रभावी
माऱ्याने हा विजय मिळवता आला.
संक्षिप्त धावफलक:
एचडीएफसी बँक एससी: ८ षटकांत ५ बाद ९६ (यश छज्जर ४८) वि. अभ्युदय बँक एससी:
७.५ षटकांत ९ बाद ३९ (अमेय बोथारे ५-५)
निकाल: एचडीएफसी बँक एससी ५७ धावांनी विजयी.

Post a Comment
0 Comments