खेलो इंडिया स्पर्धेत खोखो मध्ये मुलींकडून पंजाबचा तर
मुलांकडून दिल्लीचा धुव्वा, महाराष्ट्राची विजयी सलामी
बिहार : सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत
महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी धमाकेदार सुरुवात
करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले.
मुलींच्या गटात महाराष्ट्राने पंजाबचा ५८-९ असा धुव्वा उडवत सामना एकतर्फी केला.
या विजयात तन्वी भोसले हिने २.४१ मिनिटांचे संरक्षण, विश्वकरंडक विजेती अश्विनी शिंदे हिने २.५६ मिनिटांचे संरक्षण व ६ गुण तर दिव्या हिने ८ गुणांची आघाडी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. पंजाबच्या कमलप्रीत कौर (१.०९ मि. संरक्षण) व पूजा (४ गुण) यांनी प्रयत्न केले, पण महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे ते अपुरे ठरले.
मुलांच्या गटात, महाराष्ट्राने दिल्लीचा ३० गुणांनी पराभव करत विजयाची नोंद केली. कृष्णा बनसोडे याने १.३० मिनिटांचे संरक्षण व १० गुण,
जितेंद्र वसावे
याने १.२० व १.५० मिनिटांचे संरक्षण आणि ४ गुण,
पार्थ देवते
याने १.२० मिनिटांचे संरक्षण व ८ गुण,
तर शंकर यादव याने १० गुण मिळवत सामन्यावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून
विकास कुमार (६ गुण)
व शिवम (१.२० व १.२५ मि. संरक्षण) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला,
पण महाराष्ट्राचा बचाव आणि आक्रमण फारच भक्कम ठरले.
स्पर्धेच्या पुढील टप्प्यातही महाराष्ट्राकडून अशाच दमदार
खेळीची अपेक्षा ठेवली जात आहे.

Post a Comment
0 Comments