रिक्षा चालकाच्या मुलीचा ‘सुवर्ण’ पराक्रम! – अस्मिता
ढोणेने राष्ट्रीय विक्रमासह चमकवले पदक
राजगीर (बिहार) : सपने कितीही मोठं असलं,
त्यांचं मूळ खडतर परिस्थितीत असलं तरीही मेहनत आणि चिकाटीने
त्यांना गाठता येतं – हे सिद्ध केलंय कराडच्या अस्मिता ढोणे हिने! ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत तिने ४९ किलो गटात
राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या यशाने संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.
रिक्षा चालक दत्तात्रय ढोणे यांची कन्या असलेली अस्मिता
राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या संध्याकाळच्या सत्रात झळकली.
वेटलिफ्टिंगच्या या थरारात तिने एकूण १७० किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
यामध्ये स्नॅच प्रकारात ७३ किलो आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ९४ आणि ९७ किलो
असे दोन वेगवेगळे विक्रम रचत तिने सुवर्ण पदकावर आपले नाव
कोरले.
गत स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या अस्मिताने यंदा आपली
संपूर्ण ताकद पणाला लावत सुवर्णाची गाठ घातली. तिचा सराव कराडच्या जय हनुमान व्यायाम शाळेत सम्राट पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरू आहे. “हे यश माझ्या आई-वडिलांच्या कष्टांचे फळ आहे.
वडिलांचे आंतरराष्ट्रीय पदकाचे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार,”
असा निर्धार अस्मिताने व्यक्त केला.
महाराष्ट्रासाठी आनंदाची आणखी एक बातमी म्हणजे,
यवतमाळच्या पूजा ढेपेकर हिने
पदार्पणातच कांस्य पदक जिंकले. १३२ किलोची एकूण कामगिरी करत तिने आपले स्पर्धेतील
आगमनच लक्षवेधी ठरवले. या गटात उत्तर प्रदेशच्या मानसी चामुंडा हिला १६३ किलो
कामगिरीसह रौप्य पदक मिळाले.
या चमकदार यशामुळे महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग पथकाचा
आत्मविश्वास वाढला असून, अस्मिता ढोणे ही नाव आता देशाच्या आंतरराष्ट्रीय पदकांच्या
स्वप्नांना आकार देणारी नवी उमेद ठरत आहे!

Post a Comment
0 Comments