एसव्हीआयएस ओपन फिडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचा थाटात
समारोप!
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल,
मोशी
येथे बुद्धिमत्तेची चुरस अनुभवायला मिळाली,
कारण येथे १ व २ मे रोजी पार पडली एसव्हीआयएस पहिली ओपन फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!
जागतिक, भारतीय व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनांच्या मान्यतेने आणि
पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्पर्धेत
तब्बल ३२७
बुद्धिबळपटूंनी आपली बुद्धिमत्ता पणाला लावली.
स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी: ५ आंतरराष्ट्रीय मास्टर, ४ फिडे मास्टर, व एकूण ३० फिडे टायटलधारक खेळाडूंचा सहभाग, १६७ फिडे रेटेड खेळाडू, पहिल्यांदाच ६ डिजिटल बुद्धिबळ पटांचे थेट प्रक्षेपण केले गेले.
पाचव्या मानांकित आणि बिगर टायटलधारक विरेश शरणार्थी यांनी एकही डाव न गमावता, ८.५ गुणांसह स्पर्धा जिंकत सगळ्यांना आश्चर्यचकित केले!
त्यांचा खेळ तरुण बुद्धिबळपटूंना नवा आत्मविश्वास देणारा ठरला.
मुख्य विजेते (९ फेऱ्यांतून):
१. विरेश
शरणार्थी – ८.५ गुण (महाराष्ट्र), २. निलाश सहा (IM) – ८ गुण (पश्चिम बंगाल), ३. अथर्व मडकर – ८ गुण (महाराष्ट्र),
४. कॅडेट मास्टर रेयान एमडी – ७.५ गुण (बिहार), ५. सौरभ महामाने – ७.५ गुण
(महाराष्ट्र)
विभागवार विशेष विजेते:
महिला: निहिरा कौल – ६.५ गुण, वरिष्ठ (६०+): माधव देवस्थळी – ६ गुण, दिव्यांग: अक्षद कावळे – ३.५ गुण, १८०० खाली: आर्यन करमाळकर – ७ गुण, १६०० खाली: पार्थ मोघे – ६ गुण, ७ वर्षांखालील: कविश भट्टड – ५ गुण, ९ वर्षांखालील: नारायणी मराठे – ५.५ गुण, ११ वर्षांखालील: अविरत चौहान – ६.५ गुण, १५ वर्षांखालील: आरुष डोळस – ७ गुण
चेससबेस मराठी च्या रवी पोडवथ
यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे देशभरातील प्रेक्षकांना या
बुद्धिबळ संग्रामाचा आनंद घरबसल्या दिला!
पंच व संयोजन समितीचा उल्लेखनीय सहभाग:
मुख्य पंच आ. श्रद्धा विंचवेकर,
फिडे पंच आमरिष टल्लू, शार्दूल तापसे, अमेय कानेटकर, व इतर अनुभवसंपन्न पंचांचा अचूक आणि काटेकोर न्याय.
स्पर्धा संचालक: आ. विनीता श्रोत्री
समन्वयक: केशव प्र. अरगडे
प्रमुख आयोजक: सुधाकर विश्वनाथ (व्यवस्थापक) व मुख्याध्यापिका आरती पाटील
शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनतीने
आणि आत्मीयतेने ही स्पर्धा यशस्वी केली.
व्यवस्थापक सुधाकर विश्वनाथ यांचे मत:
"ही स्पर्धा पुण्यातील बुद्धिबळ
संस्कृतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. अशा दर्जेदार स्पर्धा नियमितपणे आयोजित करणार
आहोत!"
संपूर्ण निकाल व क्रमवारी पाहण्यासाठी भेट द्या:
https://chess-results.com/tnr1162459.aspx?lan=1

Post a Comment
0 Comments