श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट कॅरम स्पर्धा, कोल्हापूर
राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे - आकांक्षा कदमला प्रथम
मानांकन
मुंबई: श्री
दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी,
कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात
आलेल्या ९ व्या श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या
पुरुष एकेरी गटात ३०४ तर महिला एकेरी गटात ४० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष
एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरेला तर महिला एकेरी गटात रत्नागिरीच्या आकांक्षा
कदमला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. २० ते २२ जून २०२५ दरम्यान हि स्पर्धा
रंगणार असून कोल्हापूरकरांना राज्यातील योगेश परदेशी, प्रशांत
मोरे, संदीप दिवे सारख्या विश्व् विजेत्या खेळाडूंचा खेळ जवळून बघण्याची संधी
मिळणार आहे. या सामान्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब
चॅनलवरून करण्यात येणार आहे. २० जून २०२५ रोजी पुरुष एकेरी गटाने स्पर्धेत सुरुवात
होणार असून २२ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता महिला एकेरी तर दुपारी ३.३० वाजता
पुरुष एकेरी गटाचा अंतिम सामना खेळविण्यात येईल.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २) सागर वाघमारे ( पुणे ), ३) प्रफुल मोरे ( मुंबई ),
४) समीर अन्सारी ( मुंबई उपनगर ), ५) रियाझ
अकबर अली ( रत्नागिरी ), ६) झैद अहमद ( ठाणे ), ७) विकास धारिया ( मुंबई ), ८) महम्मद घुफ्रान (
मुंबई )
महिला एकेरी : १) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), २) मिताली पाठक ( मुंबई ), ३) प्राजक्ता नारायणकर (
मुंबई उपनगर ), ४)
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), ५) केशर निर्गुण (
सिंधुदुर्ग ), ६) श्रुती सोनावणे ( पालघर ), ७) अंबिका हरिथ ( मुंबई ), ८) अंजली सिरीपुरम (
मुंबई )
Post a Comment
0 Comments